मुंबई - बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांनी ऋषी कपूर आता आपल्यात नाहीत, हे स्वीकारण्यासाठी खूप वेळ लागेल अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. सोमवारी, संजय दत्तने आपला मोठा भाऊ ऋषी कपूर यांच्या आठवणीत पोस्ट लिहिली. ऋषी कपूर यांच्या गेल्या आठवड्यात आजाराने निधन झाले आहे.
मोठा भाऊ ऋषी कपूरसाठी संजय दत्तची भावनिक पोस्ट, विश्वास नाही बसत... - ऋषि कपूर निधन
संजय दत्तने सोशल मीडियावर दिवंगत ऋषी कपूर यांच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ऋषी कपूर यांना संजय दत्त मोठा भाऊ मानत होते. ऋषि कपूर हे आता आमच्यासोबत नाहीत, हे स्वीकारण्यास वेळ लागेल, असे संजय दत्त म्हणाला आहे.
चिंटू सरांनी मला शिकवलेली एक गोष्ट म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असले पाहिजे. चिंटू सर आता आपल्यात नाहीत. ही वस्तुस्थिती स्वीकारण्यासाठी मला बराच वेळ लागणार आहे. ते माझ्यासाठी नेहमीच मोठ्या भावाप्रमाणे होते. ते निघून गेले यावर विश्वास बसत नाही, असे संजय दत्त यांनी लिहिले आहे. संजयने आपल्या पोस्टसह एक छायाचित्रदेखील शेअर केले आहे, ज्यात संजय दत्त आणि ऋषी कपूर त्याचा मुलगा रणबीर कपूरसोबत ते हसत दिसत आहेत.
संजय दत्त आणि ऋषी कपूर यांनी 'हत्यारा', 'साहिबान' आणि 'अग्निपथ' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.