महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दत्त बहीण-भावानेच लढवला प्रचाराचा किल्ला; काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी फिरवली पाठ - priya dutt

काही अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी या लोकसभा मतदारसंघात दोघा बहीण-भावाच्या प्रचारावर मदार होती, असे चित्र प्रचाराच्या अखेरपर्यंत दिसून आले. प्रिया दत्त यांनी यावेळी आपल्या प्रचारासाठी एकही विभाग शिल्लक ठेवला नाही

दत्त बहीण-भावानेच लढवला प्रचाराचा किल्ला

By

Published : Apr 28, 2019, 1:38 PM IST

Updated : Apr 28, 2019, 3:22 PM IST

मुंबई - उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रिया दत्त यांच्या प्रचाराचा किल्ला संजय दत्तनेच लढवला. काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी या मतदारसंघात प्रचाराकडे पाठ दाखवली असली तरी त्याची उणीव प्रिया आणि संजय दत्त या दोघा बहीण-भावाने भरून काढल्याचे दिसून आले. विलेपार्लेपासून ते वांद्रे, कलिना, सांताक्रूझ, चांदिवली आणि कुर्ल्यापर्यंत अनेक गल्लीबोळात दोघांनी प्रचारफेरी आणि सभा घेतल्या.

काही अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी या लोकसभा मतदारसंघात दोघा बहीण-भावाच्या प्रचारावर मदार होती, असे चित्र प्रचाराच्या अखेरपर्यंत दिसून आले. प्रिया दत्त यांनी यावेळी आपल्या प्रचारासाठी एकही विभाग शिल्लक ठेवला नाही. ज्या-ज्या विभागात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी प्रचाराचे नियोजन केले, त्यासाठी त्या फिरत राहिल्या. सुरूवातीपासून त्यांच्यासोबत काँग्रेसचे आमदार नसिम खान आणि शेवटच्या आठवड्यात माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांची त्यांना साथ मिळाली. तर फारसे नियोजन नसताना ऐनवेळी एका सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी धावती हजेरी लावली.

दत्त बहीण-भावानेच लढवला प्रचाराचा किल्ला

मुंबई प्रदेशाध्यक्ष असतील अथवा काँग्रेसचा इतर कोणताही मोठा नेता प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी धावून आला नसल्याने दत्त बहीण-भावानीच सर्व खिंड लढवल्याचे दिसून आले. संजय दत्त यांनी मागील आठवड्यात आपल्या बहिणीच्या प्रचारात उडी घेतल्यानंतर प्रचार रंगात आला होता. त्यातच काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांनीही यासाठी बरीच तयारी केली असली तरी जुन्या काँग्रेसच्या नेत्यांनी या मतदारसंघात मोठ्या नेत्यांच्या काही सभा व्हायला हव्या होत्या, अशी भावना व्यक्त केली.

Last Updated : Apr 28, 2019, 3:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details