मुंबई- शहर परिसरात कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील लोकसंख्या आणि झोपडपट्टीचा भाग अधिक प्रभावित झाला असून विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. उपनगरातील भांडुप येथील एका सार्वजनिक शौचालयात सोसायटीच्या सदस्याने निर्जंतूक यंत्रणा उभी करत 'आपली सुरक्षा आपल्या हाती', अशी अनोखी संकल्पना राबविली आहे.
सार्वजनिक शौचालयात सोसायटी सदस्याने उभारले निर्जंतूक फवारे
उपनगरातील भांडुप येथील एका सार्वजनिक शौचालयात सोसायटीच्या सदस्याने निर्जंतूक यंत्रणा उभी करत 'आपली सुरक्षा आपल्या हाती', अशी अनोखी संकल्पना राबविली आहे.
मुंबईत कोरोना विषाणूचा शिरकाव हा सुरुवातीला इमारतींमध्ये झाल्यानंतर प्रशासन योग्यप्रकारे उपाययोजना राबवित होते. मात्र, कोरोनाचा रुग्ण आशियातील सर्वात मोठ्या अशा धारावी झोपडपट्टीत आढळल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारसह सर्वच यंत्रणा चिंतेत पडली. आता या ठिकाणी रोज कित्येक रुग्ण आढळत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी शारीरिक अंतर व स्वछता महत्त्वाची असून झोपडपट्टीत शेकडो लोक सार्वजनिक शौचालयाचा वापर करत असल्याने संसर्ग अधिक पसरत आहे. यावर प्रशासन प्रतिबंधित झोनमधील शौचालय सॅनिटायझर करत आहे. या प्रकारे आपली सुरक्षा आपल्या हाती म्हणून भांडुपच्या शिवणेर सोसायटीच्या सदस्यांनी एकत्र येत नळ, कोंडी, दार व शौचालयच्या ज्या ज्या ठिकाणी लोकांच्या हाताचा स्पर्श होईल, त्या ठिकाणी उंचावरून निर्जंतुक फवारणी स्वयंचलित कार्यान्वित केली आहे. या सोसायटीत 116 खोल्यातील शेकडो सदस्य शौचालयाचा वापर करतात. ही यंत्रणा बसवल्यानंतर सर्व सदस्य समाधान व्यक्त करत आहेत.