मुंबई :आर्यन खान प्रकरणात एनसीबीचे माजी रिजनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. आज सीबीआयने त्यांना या प्रकरणी चौकशीसाठी बोलवले होते. सीबीआयने तब्बल 5 तास त्यांची कसून चौकशी केली. सीबीआयच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर समीर वानखेडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणे टाळले. माध्यम प्रतिनिधींनी त्यांना चौकशीविषयी विचारणा केली असता, त्यावर त्यांनी फक्त सत्यमेव जयते, अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान शुक्रवारी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने या सुनावणी प्रकरणी महत्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने समीर वानखेडे यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला आहे. दरम्यान आज समीर वानखेडे हे सीबीआयच्या कार्यालयात पोहोचले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाचा वानखेडेंना दिलासा : सीबीआयने दाखल केलेले आरोप हे रद्द करण्यात यावेत, अशी विनंती समीर वानखेडे यांनी आपल्या याचिकेतून केली होती. दरम्यान न्यायालयाने वानखेडेंना अटकेपासून 22 मे पर्यंत संरक्षण दिले आहे. समीर वानखेडे यांचे वकील रिजवान मर्चंट म्हणाले होते, हे सर्व आरोप खोटे आहेत. शाहरुखच्या चॅटमध्ये पैशाचा आमिषाचा किंवा लाचेचा उल्लेख नाही. सीबीआयला देखील विचारणा केली. त्यांचे वकील हजर होते. या प्रकरणात जे आरोप झाले आहेत ते सर्व चुकीचे आहेत. त्याला कुठलाही पुरावा नाही, एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने त्याच्या अधिकारात काम केले आहे. वानखेडे यांनी चुकीचे निर्णय घेतले आहे, असे त्यांनी म्हटले. मात्र त्यात काही तथ्य नाही. चार महिन्यानंतर ती तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याला काही अर्थ नाही. लाच घेणारा आहे तर देणारा पण कोणीतरी असेल? कोर्टासमोर हे सगळे सांगण्यात आले आहे.