महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sameer Wankhede Death Threat : समीर वानखेडे यांना बांगलादेशमधून जीवे मारण्याची धमकी, गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल केली तक्रार - समीर वानखेडे पोलीस तक्रार

समीर वानखेडे यांना बांगलादेशमधील एका व्यक्तीनं इन्स्टाग्रामवर जीवे मारण्याची धमकी दिलीय. या प्रकरणात वानखेडे यांनी गोरेवाग पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी तपास सुरू केला.

sameer wankhede death threat
sameer wankhede death threat

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2023, 8:41 AM IST

मुंबई- हायप्रोफाईल व्यक्तींवर ड्रग्ज प्रकरणात कारवाई करणाऱ्या आयआरएस समीर वानखेडे यांना जीवे मारण्याच्या धमक्या सुरुच आहेत. बांगलादेशमधील एका व्यक्तीनं इन्स्टाग्रामच्या मेसेंजमध्ये जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार समीर वानखेडे यांनी पोलिसात दाखल केली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केल्याचे एका अधिकाऱ्यानं सांगितले.

सध्या समीर वानखेडे चेन्नईत नोकरी करत आहेत. त्यांना सोमवारी दुपारी फोनवरून धमकी मिळाली, असे समीर वानखेडे यांनी पोलीस तक्रारीत म्हटले. त्यानंतर त्याने मुंबई पोलीस आयुक्त आणि गोरेगाव पोलीस ठाण्याला ईमेल पाठवला, ज्यांच्या हद्दीत त्याचे कायमचे वास्तव्य आहे, त्यांना धमकीची माहिती दिली. समीर वानखेडे यांच्या तक्रारीनंतर गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन वर्षांपूर्वी वानखेडे हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनचे प्रमुख होते. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्या समावेश असलेल्या कथित ड्रग प्रकरणासह काही हाय-प्रोफाइल प्रकरणांचा त्यांनी तपास केला.

यापूर्वी दाऊद इब्राहिमच्या नावानं धमक्या-अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने वानखेडे कुटुंबियांना जून 2023 मध्ये धमकी मिळाली होती. मुंबई एनसीबीचे माजी प्रमुख समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकी मिळाल्याचे कळविले होते. डी कंपनीच्या नावाने धमक्यांमुळे समीर वानखेडे यांच्या पत्नी, अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी कुटुंब तणावात असल्याचे म्हटले होते. भविष्यात त्यांच्यावर किंवा कुटुंबावर हल्ले झाले तर कोण जबाबदारी घेणार? असा प्रश्न उपस्थित केला होता. विदेशातील ट्विटर हँडलवरून धमकी मिळाल्यानंतर तर अशा लोकांना वानखेडे यांनी ब्लॉक केले होते. मात्र, अजूनही धमक्या मिळत असल्याने वानखेडे कुटुंबाची चिंता वाढली आहे.

लाचखोरीचा वानखेडे यांच्यावर आरोप- एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी कॉर्डिया क्रूझ जहाजावर छापेमारी केली होती. या छापेमारीत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन हा आढळून आला होता. त्याच्यावर ड्रग्ज बाळगल्याचा ठपका ठेवत एनसीबीनं अटक केली होती. आर्यनला अटक न करण्यासाठी 50 कोटी रुपये लाच मागितल्याचा ठपका ठेवण्यात आला. या प्रकरणी सीबीआयनं वानखेडे यांची चौकशी सुरू केलीय.

हेही वाचा-

  1. Sameer Wankhede : क्रुज प्रकरणी समीर वानखेडे यांनी चौकशीलाच लावले प्रश्नचिन्ह, 20 जुलै रोजी होणार पुढील सुनावणी
  2. Petition Against Shahrukh Khan: शाहरुख खानला देखील समीर वानखेडे प्रकरणात आरोपी करावे; याचिकेची सुनावणी टळली

ABOUT THE AUTHOR

...view details