महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा आरक्षण : इडब्ल्यूएस संवर्गात १० टक्के आरक्षण मान्य नाही- संभाजी राजे

आरक्षणासंदर्भात शरद पवार काय बोलले याबाबत मला काही बोलायचे नाही. मात्र, आतापर्यत एकदाही लोकसभा आणि राज्यसभेत एकाही खासदारांनी मराठा आरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित केला नसल्याची खंत संभाजी राजेंनी व्यक्त केली. तसेच, मराठा आरक्षण हा समाजाचा विषय आहे, म्हणून सर्वपक्षीय खासदारांना लेटर दिल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले.

संभाजी राजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला
संभाजी राजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला

By

Published : Sep 29, 2020, 7:55 PM IST

Updated : Sep 30, 2020, 2:46 PM IST

मुंबई - इडब्ल्यूएस (आर्थिकदृष्ट्या मागसलेले संवर्ग) मध्ये १० टक्के आरक्षण देण्याबाबत चर्चा झाली. मात्र, आम्हाला ते मान्य नाही. या संवर्गात १० टक्के आरक्षणाने मराठ्यांचे निभावणार नसल्याचे खुद मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे. मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवले आहे. त्यामुळे, आम्हाला सामाजिक मागास वर्गातूनच आरक्षण हवे आहे, असे संभाजी राजे म्हणाले.

संभाजी राजे

मराठा आरक्षणासंदर्भात संभाजी राजे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वर्षा बंगल्यावर आज बैठक झाली. बैठकी नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांना ही माहिती दिली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावून आम्हाला आरक्षण नको. आरक्षणासंदर्भात शरद पवार काय बोलले याबाबत मला काही बोलायचे नाही. मात्र, आतापर्यंत एकदाही लोकसभा आणि राज्यसभेत एकाही खासदारांनी मराठा आरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित केला नसल्याची खंत संभाजीराजेंनी व्यक्त केली. तसेच, मराठा आरक्षण हा समाजाचा विषय आहे, म्हणून सर्वपक्षीय खासदारांना लेटर दिल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले.

दरम्यान, बैठकी आधी संभाजी राजे यांनी राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांचीही भेट घेतली होती. बैठकीत संभाजी राजे यांनी मराठा नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. आरक्षणासंदर्भात ओबीसी नेतेही या बैठकीला हजर होते.

हेही वाचा-'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम केवळ शासनाची नाही तर लोकांची - मुख्यमंत्री

Last Updated : Sep 30, 2020, 2:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details