मुंबई - आज खासदार छत्रपती संभाजीराजेंनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंची भेट घेतली. किल्ले पर्यटनाच्या दृष्टीने कसे विकसित करता येतील, यासंदर्भात आदित्य ठाकरे आणि माझ्यात चर्चा झाल्याचे वक्तव्य संभाजीराजेंनी केले. किल्ले पर्यटनाच्या दृष्टीने जगाच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले. आदित्य ठाकरेंबरोबर झालेली चर्चा ही सकारात्मक असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
संभाजीराजेंनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट, पर्यटनासाठी किल्ले जगाच्या नकाशावर आणणार - किल्ले जगाच्या नकाशावर आणणार
आज खासदार छत्रपती संभाजीराजेंनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंची भेट घेतली. किल्ले पर्यटनाच्या दृष्टीने कसे विकसीत करता येतील, यासंदर्भात आदित्य ठाकरे आणि माझ्यात चर्चा झाल्याचे वक्तव्य संभाजीराजेंनी केले.
पर्टनाच्या विकासासाठी आदित्य ठाकरेंची तळमळ आहे. त्यांना त्या क्षेत्राची जाण असल्याचे संभाजीराजे म्हणाले. आदित्य ठाकरे आणि माझा विषय साम्य आहे. राज्यातील किल्ल्यांचे पर्यटन कशा पद्धतीने होईल यावर दोघांत चर्चा झाली. रायगडचे संवर्धन कसे होत आहे, याबाबतही आदित्य ठाकरेंना माहिती दिल्याचे संभाजीराजे म्हणाले. माझे काम हे सरळ असल्याने किल्ले विकासात काही अडचण येणार नसल्याचे संभाजीराजे म्हणाले.
साई जन्मभूमीवर मुख्यमंत्री योग्य भूमिका घेतील
साई जन्मभूमीवर सध्या वादंग सुरू आहे. यावर संभाजीराजेंना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत आज बैठक आहे. ते यासंबधी योग्य भूमिका गेतील असे संभाजीराजे म्हणाले.