"....एवढे पुरावे असताना राऊतांना नेमके काय म्हणायचे कळालेले नाही" - मुंबई बातमी
महाराष्ट्रातील जनतेच्या प्रेमापेक्षा मोठा पुरावा असू शकत नाही. जर कायद्याने पुरावा पाहिजे असेल, तर उदयन राजेंकडे किंवा संभाजी राजेंकडे डॅाक्युमेंट्री आहेत, असे तंजावरचे संभाजीराजे भोसले म्हणाले.
मुंबई- शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्या टीकेला उत्तर देताना उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत, असे म्हटले होते. याविषयी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे भोसले यांचे तंजावर येथील १३वे वंशज संभाजीराजे भोसले म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेच्या प्रेमापेक्षा मोठा पुरावा असू शकत नाही. जर कायद्याने पुरावा पाहिजे असेल, तर उदयन राजेंकडे किंवा संभाजी राजेंकडे डॅाक्युमेंट्री आहेत. तसेच साताऱ्यातील राजवाडे, जमिनीवर त्यांचे नाव आहे. हे सगळे पुरावे असताना राऊत यांना नेमके काय म्हणायचे कळालेले नाही, असे म्हणत राऊतांच्या त्या वक्तव्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.