मुंबई -करोना म्हणजे शासनाने उठवलेले थोतांड आहे. करोनामुळे सध्या मंदिरे बंद असून देवांना कुलूपबंद करून ठेवण्यात आलं आहे. माझे केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशातल्या सबंध देवभक्तांना आवाहन आहे की, मंदिरांची कुलूपं तोडून आत जाऊया असे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे. या विधानामुळे त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात (गट) यांनी भिडेंवर तडीपारीची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संभाजी भिडेंना राज्यातून तडीपार करा; रिपाईची मागणी - mumbai news
संभाजी भिडे हे हे नेहमी वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असतात. त्यांनी गेल्या काही महिन्यात तोरणासंदर्भात वेगवेगळी वादग्रस्त विधाने केलेली आहेत. त्यावरून त्यांच्यावर खूप टीकाही झाली आहे. या वादग्रस्त वक्तव्यांच्या मालिकेत आणखी भर घातली आहे. त्यामुळे त्यांनातडीपार करण्याची मागणी केली जात आहे.
संभाजी भिडे हे हे नेहमी वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असतात. त्यांनी गेल्या काही महिन्यात तोरणासंदर्भात वेगवेगळी वादग्रस्त विधाने केलेली आहेत. त्यावरून त्यांच्यावर खूप टीकाही झाली आहे. या वादग्रस्त वक्तव्यांच्या मालिकेत आणखी भर घातली आहे. हे शासन हा थोतांडपणा वाढवत आहे. लॉकडाऊन लावल्यामुळेच अधिक नुकसान होत आहे. सगळं मोकळं करू देत. काहीही देशात वाटोळं होणार नाही. करोनाच्या लॉकडाऊनमुळे जेवढं नुकसान झालंय, त्याच्या एक अब्जांश देखील वाटोळं होणार नाही. सरकार लॉकडाऊन लावतंय ते शंभर टक्के चूकच आहे असे भिडे म्हणाले होते.
हेही वाचा -नाराज समर्थकांच्या भेटीसाठी पंकजा मुंडे वरळी कार्यालयात दाखल