मुंबई :आर्यन खान खंडणी प्रकरणात ज्ञानेश्वर सिंग यांनाच 9 लाख रुपये दिल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील सॅम डिसुजा याने हा आरोप केला आहे. ज्ञानेश्वर सिंगसह व्ही व्ही सिंग यांनाही पाच लाख रुपये दिल्याचा दावाही सॅम डिसुजाने न्यायालयात केला आहे. सॅम डिसुजा यांच्या या आरोपानंतर आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.
खंडणी घेतल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर आरोप :आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात खंडणी घेतल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आला होता. मात्र याप्रकरणात खंडणी आणि भ्रष्टाचार प्रकरणी आरोपी असलेल्या सॅम डिसुझाने उच्च न्यायालयात मोठा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत मुंबईचे उपमहासंचालक NCB deputy director general ज्ञानेश्वर सिंग यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. 2021 मधल्या एका प्रकरणात सॅम डिसुझाला समन्स आल्यानंतर NCB चे तत्कालीन अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांना 9 लाख रुपये देण्यात आल्याचा आरोप सॅम डिसुजाने केला. शिवाय अधिकारी व्ही व्ही सिंग यांना 5 लाख देण्यात आल्याचा दावाही या याचिकेत करण्यात आला आहे.