धुळे- जिल्ह्यातील साक्री येथे कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण साक्री गाव सील करण्यात आले आहे. त्या व्यक्तीच्या निवासस्थानापासूनचा 2 किमी अंतरापर्यंतचा परिसर खरबरदारी म्हणून सील करण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री येथील एका 53 वर्षीय व्यक्तीचा शुक्रवारी (दि. 10 एप्रिल) सायंकाळी मृत्यू झाला. या व्यक्तीला न्युमोनियादेखील झाला असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली होती. या व्यक्तीच्या मृत्यूनंतर संपूर्ण साक्री गाव सील करण्यात आले आहे.