मुंबई : बहुचर्चित आणि कथित दापोली येथील साई हॉटेल बांधकाम हे बेकायदा पद्धतीने झाले असल्याचा आरोप सक्तवसुली संचनालयाने ठेवलेला आहे. यात आर्थिक गैरव्यवहार झाला असून त्यामध्ये सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांचा सहभाग असल्याचे आरोपपत्र सक्त वसुली संचालनालयाने दाखल केले आहे. त्यानंतर दोघांनी जामिनासाठीचा अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल केला होता. मात्र दोन जूनपर्यंत सुनावणी तहकूब केली गेली आहे.
ईडीने जामीनला दिला होता नकार : न्यायाधीश रजेवर असल्यामुळे ही सुनावण्यात 2 जून रोजी होणार आहे. जामीनवरील सुनावणी लांबणीवर पडल्यामुळे कदम व जयराम देशपांडे यांची न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. सक्त वसुली संचलनालयाने सदानंद कदम यांचा अनिल परब यांनी जे दापोली येथील साई रिसॉर्ट बांधकाम केले. त्यामध्ये महत्वाच सहभाग आहे आणि त्यासंदर्भात नुकतेच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. जयराम देशपांडे जो की माजी जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर देखील आरोप पत्र निश्चित करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपींच्या वतीने जामिनासाठी आज अर्ज केला गेला होता. ईडीच्या वकिलांनी मागील सुनावणीस त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. काही काळ त्यांनी युक्तिवाद मांडला की "कदम आणि देशपांडे यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत, त्यामुळे त्यांना जामीन मिळू नये ",अशी विनंती न्यायालयाला केली होती.