दहिसरमधील सागर इंडस्ट्रीतील आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश
आज सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास दहिसर टोल नाक्याजवळील सागर इंडस्ट्रीत आग लागली. सागर इंडस्ट्रीतील इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या पॅकेजिंगच्या कारखान्यात आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीमुळे परिसरात मोठया प्रमाणात धुराचे लोळ पसरले होते.
सागर इंडस्ट्रीला लागलेली आग
मुंबई - शहरात आज सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास दहिसर टोल नाक्याजवळील सागर इंडस्ट्रीत आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये कुठलीही जिवितहानी झाली नाही.
सागर इंडस्ट्रीत अचानक आग लागल्याने परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली. तत्काळ अग्निशमन दलाला बोलावून आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे. अग्निशमन दलाने २ क्रमांकाच्या आगीची वर्दी जारी केली आहे.
Last Updated : Mar 4, 2019, 11:58 PM IST