महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sadabhau Khot Vs Suniel Shetty : टोमॅटो भाववाढीवरुन सदाभाऊ खोत अन् सुनिल शेट्टीमध्ये वाकयुद्ध; जागतिक भिकारी सुनील अण्णा जर.... - टोमॅटो दरवाढ

टोमॅटोची भाववाढ चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. टोमॅटो भाववाढीवरुन (Sadabhau Khot Vs Suniel Shetty) अनेकजण भाष्य करत आहेत. अशातच अभिनेता सुनिल शेट्टी याने टोमॅटो भाववाढीवर भाष्य केले होते. सुनिल शेट्टीच्या त्या विधााची चांगलीच चर्चा झाली होती. त्या विधानावरून आता शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी सुनिल शेट्टीचा खरपूस समाचार घेतला.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jul 14, 2023, 10:37 PM IST

मुंबई - शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी अभिनेता सुनिल शेट्टीच्या विधानाचा चांगलाच समाचार (Sadabhau Khot Vs Suniel Shetty) घेतला आहे. जागतिक भिकारी म्हणत सदाभाऊ खोत यांनी सुनिल शेट्टीला सुनावले आहे. खोत आणि शेट्टी यांच्या या शाब्दिक युद्धाची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे.

आजकाल मी टोमॅटो कमीच खातो. लोकांना वाटले की मी सुपरस्टार असल्याने या गोष्टीचा माझ्यावर परिणाम होणार नाही, पण हे खोटे आहे, आम्हालाही अशा समस्यांना सामोरे जावे लागते - सुनील शेट्टी, अभिनेता

जागतिक भिकारी सुनील अण्णा शेट्टी जर कटोरा घेऊन दारी आला तर टमाटू वाढग माई - सदाभाऊ खोत, शेतकरी नेते

काय आहे प्रकरण नेमके -लोकांना वाटले की मी सुपरस्टार असल्याने टोमॅटो भाववाढीचा माझ्यावर परिणाम होणार नाही, पण हे खोटे आहे, आम्हालाही अशा समस्यांना सामोरे जावे लागते, असे भाष्य अभिनेता सुनिल शेट्टी याने केले होते. यावर शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, सुनिल शेट्टी कटोरा घेऊन तुमच्या दारी भीक मागायला आला तर त्याला टोमॅटो भीक म्हणून दे गं बाई असे विधान खोतांनी केले आहे.

सदाभाऊ खोत यांचा संताप - सध्या टोमॅटोचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अभिनेते हे संवेदनशील असतात असे ऐकले होते. मात्र, काही अभिनेते हे सडक्या डोक्याचे आहेत. सुनिल शेट्टी आर्थिकदृष्ट्या गब्बर सिंग आहे तरी त्याला टोमॅटो खायला परवडत नाही. शेतकऱ्याची भूमिका करायची असेल तर कोट्यवधी रुपये घेता. तोच शेतकरी एका बाजूला आत्महत्या करतोय, कधीतरी १०-१२ वर्षांतून चांगला भाव मिळाला की तुमच्यासारख्या जागतिक भिकाऱ्यांच्या पोटात दुखायला लागते, असा संताप सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा -

  1. Tomato Price Controversy: कोल्हापुरात माणुसकीला काळीमा ; भाव वाढल्यामुळे समाजकंटकाकडून टॉमेटोच्या शेतीचे नुकसान
  2. Birthday Gift Tomato: भावाने बहिणीच्या वाढदिवसाला दिले टोमॅटो भेट; अनोख्या भेटवस्तूमुळे चर्चा
  3. Tomato Free With Mobile : दुकानदाराची अनोखी ऑफर; स्मार्टफोन खरेदीवर 2 किलो टोमॅटो फ्री!

ABOUT THE AUTHOR

...view details