मुंबई :क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने आज आपल्या वयाचे अर्धशतक गाठले आहे. त्यानिमित्त सचिनच्या चाहत्यांकडून मास्टर ब्लास्टरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सचिन तेंडुलकरने दिलेल्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल एमसीएकडून सचिनला मोठे गिफ्ट देण्यात येणार आहे. सगळ्यांच्या आवडत्या सचिन तेंडुलकरचा पुतळा वानखेडे मैदानावर उभारण्यात येणार आहे.
तब्बल 24 वर्ष केली गोलंदाजांची धुलई :सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणून त्याचे चाहते संबोधतात. आज या क्रिकेटच्या देवाचा 50 वाढदिवस आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या 24 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक दिग्गज गोलंदाजांची धुलाई केली आहे. पाकिस्तानचा सुप्रसिद्ध गोलंदाज रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर, ऑस्ट्रेलियाचा प्रख्यात गोलंदाज ग्लेन मॅकग्रा, शेन वार्न आदी दिग्गज गोलंदाजांची सचिनने चांगलीच धुालई केलेली आहे.
स्वप्नातही दिसतो सचिन : सचिन तेंडुलकरने भारतीय क्रिकेटला मोठी उंची उंची मिळवून दिली. सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधील अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर कोरले आहेत. पाकिस्तानचा गोलंदाज शोएब अख्तर आणि सचिन तेंडुलकरचा सामना पाहण्यासाठी क्रिकेटचे चाहते जीव मुठीत घेऊन बसत होते. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने आपल्या कारकिर्दीत अनेक फलंदाजांना सळो की पळो करुन सोडले. मात्र सचिन तेंडुलकरचा शेन वॉर्नने चांगलाच धसका घेतला होता. इतका की सचिन आपल्या स्वप्नात येऊन सिक्सर मारतो, असेही शेन वॉर्नने जाहीर कार्यक्रमात सांगितले होते.