मुंबई - लोकशाहीत विरोधकांना सरकारवर टीका करण्याचा अधिकार आहे, मात्र सत्तेमुळे बेफाम झालेल्या कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात टीका केल्यास, त्याविरोधात अत्यंत हीन पातळीवर येऊन कार्यकर्त्यांकडून अर्वाच्च शिविगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. सत्तेमुळे बेफाम झालेल्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे केली आहे.
सत्तेमुळे बेफाम झालेल्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करा; सावंत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - bjp
सत्तेमुळे बेफाम झालेल्या कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात टीका केल्यास, त्याविरोधात अत्यंत हीन पातळीवर येऊन कार्यकर्त्यांकडून अर्वाच्च शिविगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. सत्तेमुळे बेफाम झालेल्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मला स्वतःला २०१५ साली चिक्की घोटाळा उघडकीस आणला असताना धमक्या आणि शिवीगाळ याचा अनुभव आला आहे. याची समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. महिनाभरापूर्वी मला पुन्हा धमक्या आल्यानंतर त्याचीही तक्रार मी ७ मे रोजी पोलीस ठाण्यात केली होती. गेल्या दोन दिवसांपासून सरकारवर केलेल्या टिकेवरील ट्विट् संदर्भात समाज माध्यमांवर अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि फोनवरून जाहीर धमक्या दिल्या जात आहेत. यात राज्याच्या वरिष्ठ मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक असल्याचे दाखवला जात आहे. त्यामुळे सरकारला विरोधकांनी केलेल्या टीका आवडत नाहीत काय? असा सवाल सावंत यांनी आपल्या पत्रात केला आहे. लोकशाहीत विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे, लोकशाहीची उदात्त परंपरा असलेल्या आणि या पुरोगामी महाराष्ट्रात असे कधीही घडले नाही.