महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पहारेकरी नेमण्यापूर्वी पोलिसांकडून त्याची चारित्र्य तपासणी करून घ्या - सचिन सावंत - congres

पहारेकरी नेमण्यापूर्वी पोलिसांकडून त्याची चारित्र्य तपासणी करून घ्या... भाजपच्या मै भी चौकीदार कॅम्पेनवरून काँग्रेस नेते सचिन सावंतांची टीका.. नावाअगोदर चौकीदार लावणाऱ्या चोरांपासून सावधान राहण्याचा दिला इशारा

सचिन सावंत

By

Published : Mar 18, 2019, 9:56 AM IST


मुंबई- अनेक चोर, गुन्हेगार हे स्वतःला चौकीदार म्हणवू लागल्याने देशात अभूतपूर्व असुरक्षिततेचे वातावरण तयार झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पहारेकऱ्यांकडेही लोक संशयाने पाहू लागले आहेत. त्यामुळे प्रामणिक पहारेकऱ्यांची मनस्थिती ही भांबावल्यासारखी झाली आहे. जनतेने कोणालाही पहारेकऱ्याची नोकरी देण्याआधी पोलिसांकडून त्याची चारित्र्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.

सचिन सावंत

या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, देशात चौकीदार म्हणून काम करणा-यांपेक्षा स्वतःच्या नावा अगोदर चौकीदार लिहिणाऱयांपासून प्रचंड धोका आहे. बहुतांश चोर मंडळी जनतेचा विश्वास संपादन करण्याकरीता अशा कार्यपद्धतीचा वापर करत असल्याने त्यांना नोकरी दिल्यास चोरी अथवा गुन्हा घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्था, व्यापारी संकुले, घर, दुकाने यांच्या सुरक्षेसाठी चौकीदार नेमताना काळजी घ्यावी, असे सावंत म्हणाले.

देशातील पोलीस प्रशासनही अशा पद्धतीने कोणालाही नोकरीला ठेवताना त्याची चारित्र्य पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन करत असते. आतातर शिक्षकांपासून इतर अनेकांना नोकरी देताना पोलीस तपासणीची अट घातलेली आहे. देशातील प्रामाणिक चौकीदार पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेण्याकरीता निश्चितच आनंदाने तयार होतील. स्वतःच्या नावाअगोदर चौकीदार लावणारे भामटे मात्र या तपासणीपासून पळ काढतील, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details