मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या 'वर्षा' निवासस्थानातील एका खोलीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिला आहे. याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
'वर्षा'तील ठाकरेंबाबतच्या 'त्या' मजकुराची चौकशी व्हावी, काँग्रेसची मागणी - वर्षा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या 'वर्षा' निवासस्थानातील एका खोलीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिला आहे. याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांसाठी शासकीय निवास असलेल्या वर्षा बंगल्यात पूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राहत होते. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर फडणवीसांना तो बंगला सोडावा लागला. त्या बंगल्याच्या साफ-सफाईसाठी कर्मचारी वर्षा बंगल्यावर गेले असता त्या बंगल्यात एका ठिकाणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचे दिसून आले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया देत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी याबाबत चौकशी व्हावी, अशी मागणी केली. चौकशीनंतर दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होईल आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या घरातील कोणी दोषी ठरल्यास फडणवीस यांनी समज द्यायला हवा, असेही सावंत म्हणाले.
हेही वाचा - नेरूळमध्ये आढळला साडेनऊ फूट लांबीचा अजगर