महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेस आक्रमक : राज्य सरकारने १६ ते २१ सप्टेंबरपर्यंत घेतलेल्या निर्णयांची चौकशी करा - BJP news

सरकारने १६ ते २१ सप्टेंबर दरम्यान घेतलेल्या निर्णयांची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी लोकायुक्तांकडे केली आहे.

सचिन सावंत

By

Published : Sep 21, 2019, 6:29 PM IST

Updated : Sep 21, 2019, 7:52 PM IST

मुंबई- राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे राज्य सरकारकडून सोमवार १६ सप्टेंबरपासून आजपर्यंत (ता. २१ सप्टेंबर) सरकारच्या सर्व विभागाने घेतलेल्या निर्णयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता आहे. यामुळे या सर्व निर्णयांची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याच्या लोकायुक्तांना पत्राद्वारे केली आहे.

बोलताना सचिन सावंत


या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले, की निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. याचा अंदाज असल्याने राज्याच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनी आर्थिक लागेबांधे असलेले व स्वपक्षातील कार्यकर्त्यांना राजकीय व आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी अनेक 'अर्थ'पूर्ण निर्णय या आठवड्यात अत्यंत घाईगडबडीत घेतल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारचे संकेतस्थळ पूर्णपणे ठप्प झालेली आहे. अनेक निर्णय मागच्या तारखेत घेतले आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न अनेक मंत्र्यांच्या कार्यालयात सुरु आहे. म्हणूनच १६ सप्टेंबरपासून आजपर्यंत घेतलेल्या सर्व निर्णयांची चौकशी करावी. तसेच आचारसंहितेची अमंलबजावणी सुरु झाल्याच्या क्षणापासून कोणत्याही निर्णयाची माहिती शासकीय संकेतस्थळावर प्रकाशीत करण्यास मनाई करावी तसेच असे निर्णय तात्काळ रद्दबादल ठरवावेत. दि. २० सप्टेंबरपासून महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ ठप्प का आहे? याची ही चौकशी करावी, अशी मागणी सावंत यांनी लोकायुक्तांकडे केली आहे.

Last Updated : Sep 21, 2019, 7:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details