मुंबई - पनवेल महापालिकेत अधिकाऱ्यांकडून कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण होत असल्याची भयानक माहिती समोर आली आहे. या महिलांनी मुख्यमंत्री व महिला आयोगाकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
पनवेल पालिकेतल्या अधिकाऱ्यांकडून कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण - सचिन सावंत - physical abused case
पनवेल महापालिकेत अधिकाऱ्यांकडून कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण होत असल्याची भयानक माहिती समोर आली आहे. या महिलांनी मुख्यमंत्री व महिला आयोगाकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
सचिन सावंत
'वाचवा आता महाराष्ट्र', असे म्हणत सचिन सावंत यांनी महापालिकेच्या कामकाजावर टीका केली आहे. स्मार्ट सीटीचे स्वप्न पाहणाऱ्या पनवेल महापालिकेमधील कामकाजाला शिस्त लावण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या गैरवर्तणुकीमुळे पालिकेची प्रतिमा मलिन होत आहे.