महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'यमराजा'ने मुंबई पालिकेला कंत्राट दिल्यासारखेच वाटते, सचिन सावंतांचा शिवसेनेवर निशाणा

महापालिकेने माणसांची किंमत शून्य केली आहे. जागोजागी मानवनिर्मित मृत्यूचे सापळे लावले असल्याचे वक्तव्य करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

सचिन सावंतांचा सेनेवर निशाणा

By

Published : Jul 14, 2019, 8:55 AM IST

मुंबई - महापालिकेने माणसांची किंमत शून्य केली आहे. जागोजागी मानवनिर्मित मृत्यूचे सापळे लावले असल्याचे वक्तव्य करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. यमाने महापालिकेला कंत्राट दिल्यासारखेच वाटत अल्याचेही सावंत म्हणाले.

वरळी सी-लिंकजवळ कोस्टल रोडजवळ खोदलेल्या खड्ड्यात पडून एका १२ वर्षीय मुलाला प्राण गमवावे लागल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. बबलू कुमार पासवान असे या मृत मुलाचे नाव आहे. या घटनेवरुन सावंत यांनी सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला.

वरळी सी-लिंकडजवळ कोस्टल रोडसाठी एक खड्डा खणण्यात आला होता. शुक्रवारी, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बबलू कुमार पासवान हा मुलगा या खड्ड्यात पडला. या ठिकाणी असलेल्या स्थानिकांनी बबलू कुमारला प्रयत्न करून बाहेर काढले. त्याला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याला डॉक्टरांनी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मृत घोषित केले.

दोन दिवसांपूर्वीच खुल्या गटारात पडून चिमुकल्या दिव्यांशचा मृत्यू झाला होता. त्याच्या अपघाताला शिवसेना व बीएमसी जबाबदार असल्याचे सावंत म्हणाले. गतवर्षीही एक डाॅक्टरही गटारात पडून गेले. महापौर व बीएससीकडून अशा घटनावर उत्तरे मिळत नाहीत. निगरगट्ट शिवसेना व महापालिकेविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल केला पाहिजे, असेही सावंत म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details