मुंबई - शिवसेनेत प्रवेश केल्यावर आजपासून पक्ष वाढवण्याची जबाबदारी असणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसमधून गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन अहिर यांनी म्हटले आहे.
शहरीकरण व नागरीकरण मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून वाढत आहे. आदित्य व उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. मुंबईपुरते काम न करता राज्याचा विचार करा असे त्यांनी सांगितले आहे. त्यानुसार अनके भागात काम करून मोठे योगदान देण्याचे काम करणार असल्याचे अहिर म्हणाले.