महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबईत संघाची नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ रॅली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागिरकत्व दुरुस्ती कायद्याच्याविरोधात रॅली काढणार असल्याचे सांगितल होते. त्यानुसार रविवारी ही रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या रॅलीला सुरुवात झाली, तर वाशी रेल्वे स्थानक परिसरात रॅलीचा समारोप झाला.

citizenship amendment act
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ रॅली

By

Published : Dec 23, 2019, 8:22 AM IST

नवी मुंबई -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नवी मुंबईतील वाशी परिसरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली. बेकायदेशीरपणे घुसखोरी करणाऱ्या लोकांना कायद्याची भीती वाटत आहे. मात्र, इतर लोकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे यावेळी सांगण्यात आले.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ रॅली

नागरिकत्व दुरुस्ती कायदा संमत झाल्यानंतर ठिकठिकाणी कायद्याला विरोध केला जात आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागिरकत्व दुरुस्ती कायद्याच्याविरोधात रॅली काढणार असल्याचे सांगितल होते. त्यानुसार रविवारी ही रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या रॅलीला सुरुवात झाली, तर वाशी रेल्वे स्थानक परिसरात रॅलीचा समारोप झाला. यावेळी रॅलीमध्ये सहभागी झालेल्यांनी आम्ही कायद्याचे समर्थन करीत असल्याचे सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details