महाराष्ट्र

maharashtra

RPF Recruitment News Is Fake : आरपीएफ पोलिसांच्या भरतीची बातमी खोटी, आरपीएफने दिली माहिती

By

Published : Jan 11, 2023, 7:36 PM IST

रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांची 19800 पदांची भरती होणार असल्याची जाहीरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र हा संदेश, ही बातमी खोटी आहे आणि त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष करावे असे आवाहन आरपीएफकडून करण्यात आले आहे.

RPF Recruitment News Is Fake
आरपीएफने दिली माहिती

मुंबई : देशात बेरोजगारी वाढत असताना नोकरीची संधी मिळेल, या अपेक्षेने युवक कोणतीही शहानिशा न करता अर्ज करत असतात. त्यामुळे बेरोजगारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते, असाच एक प्रकार समोर आला आहे. रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांची 19800 पदांची भरती होणार असल्याची जाहीरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र हा संदेश, ही बातमी खोटी आहे आणि त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RPF Recruitment News Is Fake

रेल्वे सुरक्षा बलात भरती :रेल्वेच्या संपत्तीची सुरक्षा करण्यासाठी तसेच रेल्वेमधील गुन्हे रोखण्यासाठी आरपीएफ पोलीस नियुक्त केले जातात. देशभरात ज्या ठिकाणी रेल्वेची संपत्ती आहे, त्याठिकाणी हे पोलीस नियुक्त केले जातात. रेल्वे स्टेशन, रेल्वे परिसर, ट्रेन उभ्या केल्या जाणारी गार्ड, रेल्वेचे तिकीट आणि इतर मार्गाने येणारे पैसे आदींची ने आण करणे, रेल्वे परिसरात पेट्रोलिंग करणे आदी कामांसाठी आरपीएफ पोलिसांची नियुक्ती केली जाते. याच आरपीएफ विभागात 19800 पदांची भरती होणार असल्याचे सोशल मीडियावरून तसेच माध्यमातून प्रसिद्ध झाले आहे. यामुळे या भरतीची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.



ही बातमी खोटी : रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) मध्ये पोलीस शिपाई (कॉन्स्टेबल) पदाच्या 19800 जागांच्या भरतीबाबत सोशल मिडिया, अर्थात समाज माध्यमे आणि वर्तमानपत्रांमध्ये एक बनावट संदेश प्रसारित केला जात आहे. या निवेदना द्वारे सूचित केले जाते की आरपीएफ किंवा रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा कोणत्याही छापील किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमा द्वारे अशी कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही. ही बातमी खोटी आहे आणि त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष करावे असे, आवाहन आरपीएफकडून करण्यात आले आहे.


फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या :कोणत्याही विभागात भरती केली जाणार असल्यास त्याची माहिती त्या विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून दिली जाते. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी किंवा अर्ज विकत घेण्यापूर्वी खरोखर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे का? याची खातरजमा करावी. त्यानंतरच अर्ज भरावा. अशा खोट्या बातम्या बाबत केंद्र सरकारचे पीआयबी फॅक्ट चेकिंग करते. आणि सत्य परिस्थिती समोर आणून ती बातमी खोटी असल्याचे उघड करते. त्यामुळे उमेदवारांची फसवणूक होणार नाही यासाठी प्रयत्न करावा.

ABOUT THE AUTHOR

...view details