महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Robber Beaten customer : दरोडेखोरांनी ग्राहकाला जबर मारहाण करत लुटले; घटना सीसीटीव्हीत कैद - ग्राहकाला जबर मारहाण

मुंबईतील क्वालिटी ऑफ पंजाब हॉटेलमध्ये (Quality of Punjab hotel robbery) 10 ते 12 जणांच्या टोळक्याने दोघांना जबर मारहाण (customer beaten up) करत दरोडा टाकला. एक सोन्याची चैन आणि मोबाईल लंपास (Expensive materials looted) करत या टोळक्याने पोबारा केला. कोपरखैरणे पोलिसांनी या अनोळखी टोळक्यांपैकी दोघांना अटक (arrested in robbery case) केली असून 10 जण फरार आहेत. latest news from Mumbai, Mumbai Crime

Robber Beaten customer
दरोडेखोरांनी ग्राहकाला जबर मारहाण

By

Published : Nov 27, 2022, 9:06 PM IST

नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर 14 मधील क्वालिटी ऑफ पंजाब हॉटेलमध्ये (Quality of Punjab hotel robbery) 10 ते 12 जणांच्या टोळक्याने दोघांना जबर मारहाण (customer beaten up) करत दरोडा टाकला. एक सोन्याची चैन आणि मोबाईल लंपास (Expensive materials looted) करत या टोळक्याने पोबारा केला. कोपरखैरणे पोलिसांनी या अनोळखी टोळक्यांपैकी दोघांना अटक (arrested in robbery case) केली असून 10 जण फरार आहेत. आरोपींविरोधात भादंवि कलम 395, 397, 506 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (hotel robbery incident caught on CCTV) झाली आहे. latest news from Mumbai, Mumbai Crime

ग्राहकाला दरोडेखोरांची मारहाण

क्षुल्लक कारणावरून कानशिलात लगावली :23 तारखेला रात्री एक ते दिडच्या दरम्यान फिर्यादी दिपक चंद्रकांत कोल्हे हे आपले मित्र संदीप तावरे यांच्यासह क्वालिटी ऑफ पंजाब हॉटेलमध्ये जेवण करत होते. दरम्यान दरोडेखोर टोळक्यांपैकी एकाने शुल्लक कारण शोधत चंद्रकांत कोल्हे यांना त्यांच्या टेबल जवळ जाऊन कानशिलात लगावली. त्यानंतर प्रतिकार करताच इतर अकरा जणांनी कोल्हे आणि तावरे यांच्यावर जबर हल्ला केला. हॉटेलमधील खुर्च्या, जेवणाच्या प्लेट, पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स आणि बियरच्या काचेच्या बाटल्या फेकून मारत या दोघांना रक्तबंबाळ केले.

किमती ऐवज लुटला :त्यानंतर संदीप तावरे यांच्या गळ्यातील 11 ग्रॅम वजनाची ३३,००० रू. किमतीची सोन्याची चैन आणि ५,००० रू. किमतीचा कोल्हे यांचा व्हिवो कंपनीचा मोबाईल घेऊन पसार झाले. पोलीस या संपूर्ण घटनेचा कसून तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details