महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्ती सीबीआय चौकशीनंतर घरी परतली

सुशांतसिंह प्रकरणात रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांची सहा तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर काल रियाला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार रिया सीबीआय कार्यालयात शुक्रवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर झाली होती.

sushant singh rajput death case  riya chakraborty CBI interrogation  sushant singh rajput death case investigation  सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरण चौकशी  रिया चक्रवर्ती सीबीआय चौकशी
सुशांतसिंह मृत्यप्रकरणी रिया चक्रवर्ती सीबीआय चौकशीनंतर घरी परतली

By

Published : Aug 29, 2020, 6:44 AM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयकडून तपास केला जात आहे. यासंदर्भात आठव्या दिवशी रिया चक्रवर्तीची तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर तिला घरी पाठविण्यात आले.

सुशांतसिंह प्रकरणात रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांची सहा तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर काल रियाला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार रिया सीबीआय कार्यालयात शुक्रवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर झाली होती. तिची तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. मात्र, त्यानंतरही सुशांतचा जवळचा मित्र सिद्धार्थ पिठानीची चौकशी सुरूच होती. पिठानी याने दिलेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी त्याला पुन्हा एकदा सुशांतसिंहच्या वांद्र्यातील घरी नेण्यात आले होते. याठिकाणी घडलेल्या प्रकराबद्दल पुन्हा एकदा सीबीआयच्या पथकाने काही प्रश्न विचारले होते. त्यानंतर त्याला वांद्रे येथून परत सीबीआय कार्यालयात आणण्यात आले. काही वेळ चौकशी करून त्याला घरी पाठविण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details