महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 16, 2019, 7:27 PM IST

ETV Bharat / state

घाटकोपर पूर्व विधानसभा आढवा: भाजप गड राखणार का ?

मतदारसंघात मराठी-गुजराती हा सुप्त वाद होता. परंतु, मराठीचा मुद्दा केव्हाच मागे पडला आहे. मराठी भाषिकही भाजपला पाठींबा देत आहेत. मतदारसंघातील आमदार मेहता यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डच्चू देत काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राधाकृष्ण विखे-पाटलांकडे गृहनिर्माण खाते सोपवले आहे.

घाटकोपर पूर्व विधानसभा

मुंबई- गुजराती मतदारांचे प्राबल्य असणारा घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. मागील 6 टर्म माजी मंत्री प्रकाश महेता निर्विवादपणे निवडून येत आहेत. या ठिकाणी अन्य राजकीय पक्षांचे अस्तित्व असले तरी भाजपसमोर कोण? असा प्रश्न नेहमीच निर्माण होत आहे. या मतदारसंघात दलित मतदारांची एकगठ्ठा मते असली तरी त्याचे नेहमीच विभाजन होत आले आहे.

घाटकोपर पूर्व विधानसभा आढवा

हेही वाचा - विधानसभा 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं; प्रत्येकी 125 जागा लढवणार

शिवसेना, मनसे या पक्षांचे अस्तित्व येथे आहे. मात्र, युतीमध्ये ही जागा भाजपसाठी दिली जाते. 2014 साली शिवसेनेने वेगळे लढूनही या मतरसंघावर भगवा फडकवता आला नव्हता. तर मनसेलाही मराठी मतदारांवर विशेष प्रभाव आतापर्यंत पाडता आलेला नाही. त्यामुळे भाजपला मिळणारे गुजराती एकगठ्ठा मतदान आणि मराठी भाषिकांसह इतरांचा पाठिंबा मोडून काढणे, हे विरोधकांसमोर मुख्य आव्हान असणार आहे.

भौगोलिक स्तिथी -

घाटकोपर पूर्व विधानसभा क्षेत्रात मोठा भाग इमारतींनी व्यापला आहे. जवळपास 30 टक्के लोक झोपडपट्टीत राहतात. बहुतांश भागात पुनर्विकासाची कामे सुरू आहेत.

मतदारसंघात मराठी-गुजराती हा सुप्त वाद होता. परंतु, मराठीचा मुद्दा केव्हाच मागे पडला आहे. मराठी भाषिकही भाजपला पाठींबा देत आहेत. मतदारसंघातील आमदार मेहता यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डच्चू देत काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राधाकृष्ण विखे-पाटलांकडे गृहनिर्माण खाते सोपवले आहे. महेतांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांच्याकडून गृहनिर्माण खाते काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे मेहतांना उमेदवारी मिळणार नसल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. त्यामुळे स्वतःसाठी किंवा कुटुंबामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी मेहतांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

हेही वाचा - सरकारला जनतेच्या त्रासाची जाणीव आहे - आदित्य ठाकरे

मतदारसंघात विरोधक प्रबळ नसल्याने मेहता यांची लढाई ही स्वतःच्या पक्षातील लोकांशी असणार आहे. मेहता यांचे कट्टर राजकीय विरोधक समजले जाणारे प्रविण छेडा यांना भाजपने प्रवेश दिला आहे. त्यामुळे प्रविण छेडा यांच्या भाजपमधील प्रवेशामुळे विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

काय असतील राजकीय समीकरण -

काँग्रेसकडून राजा मिराणी, विरेंद्र बक्षी आणि अशोक भानुशाली यांच्या नावांची चर्चा आहे. वीरेंद्र बक्षी यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जर घाटकोपर पूर्व विधानसभा क्षेत्रातून लढला तर ती औपचारिकता असेल. भाजप आणि शिवसेनेची युती न झाल्यास शिवसेनेकडून परमेश्वर कदम यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळू शकते.

भारतीय जनता पक्षाकडून प्रकाश मेहता, काँग्रेसमधून भाजपत आलेले प्रवीण छेडा आणि मुंबई महानगरपालिकेतले सर्वात श्रीमंत नगरसेवक पराग शाह यांच्या नावांची चर्चा आहे. प्रकाश मेहता यांचा अनुभव आणि पक्षातील वरिष्ठांशी असलेले संबंध त्यांच्या पारड्यात पुन्हा विधानसभेचे तिकीट टाकू शकतात. परंतु, पक्षाला नवा चेहरा हवा असेल तर छेडा किंवा शाह यांना संधी मिळू शकेल. त्यामुळे या ठिकाणी भाजप गड राखणार की, इतर कोणाला मतदार कौल देणार हे आगामी विधानसभा निवडणुकीत समोर येईलच.

  • विधानसभा निवडणूक 2014 निकाल
  • मतदानाची टक्केवारी – 56.30 %
  1. प्रकाश मेहता, भाजप – 67,012
  2. जगदीश चौधरी, शिवसेना – 26,885
  3. प्रवीण छेडा, काँग्रेस – 21,303
  4. राखी जाधव, राष्ट्रवादी – 10,471
  5. सतीश नारकर, मनसे – 7696
  6. नोटा – 1850

ABOUT THE AUTHOR

...view details