महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना चाचणीसाठी महाराष्ट्रातील सहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये साधनसामुग्री उपलब्ध

सध्या कोरोना चाचणी सुविधा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विस्तारण्यास सुरूवात झाली आहे. त्यासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्रीदेखील उपलब्ध आहे. मात्र, या ठिकाणी चाचणी सुरू करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून परवानगी मिळणे गरजेचे आहे.

Meeting of Rajesh Tope
राजेश टोपेंची बैठक

By

Published : Mar 26, 2020, 10:07 PM IST

मुंबई - कोरोनाच्या चाचणीसाठी महाराष्ट्रातील सहा (धुळे, अकोला, औंगाबाद, सोलापूर, मिरज, नागपूर) वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध झाली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) याला तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे केली.

कोरोनाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव आदी उपस्थित होते. महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत आणि आरोग्य विभागाच्या कामगिरीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची मागणी केंद्राकडे केली. कोरोना प्रतिबंधासाठी अत्यावश्यक वैद्यकीय साधने एन ९५ मास्क, ट्रीपल लेअर मास्क, पीपीई, व्हेंटिलेटर यांची आवश्यक ती उपलब्धता राज्यात आहे. मात्र, आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास भविष्यकालीन तरतूद म्हणून या अत्यावश्यक वैद्यकीय साधनसामुग्रीची पूर्तता केंद्र शासनाने करावी, अशी मागणी करण्यात आली.

हेही वाचा -Coronavirus : नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास सुरू - उद्धव ठाकरे

राज्यात कोरोना प्रतिबंधासाठी केंद्राच्या सूचनेनुसार कार्यवाही केली जात आहे. आतापर्यंत १८ कोरोनाबाधितांना घरीदेखील सोडण्यात आले आहे. सध्या कोरोना चाचणी सुविधा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विस्तारण्यास सुरूवात झाली आहे. त्यासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्रीदेखील उपलब्ध आहे. मात्र, या ठिकाणी चाचणी सुरू करण्यासाठी आयसीएमआरकडून परवानगी मिळणे गरजेचे आहे. ही परवानगी तातडीने द्यावी जेणेकरून धुळे, अकोला, औरंगाबाद, सोलापूर, मिरज, नागपूर या ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये चाचण्या करता येतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details