मुंबई- कोरोनामध्ये सर्वच यंत्रणा मैदानात उतरून काम करत आहे, त्यात पोलिस यंत्रणा सर्वात पुढे आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतल्या लॉकडाऊनमध्ये बाहेर हिंडणाऱ्यांना चांगलाच लाठ्यांचा प्रसाद पोलिसांनी दिला होता, तर दुसऱ्या लाटेत पोलिस बाहेर फिरणाऱ्यांना संयमाने सांगत असून सूचना देत आहेत.
मागितली परवानगी, मिळालं हटके उत्तर - कोरोना बातमी
नागरिकांना विनाकारण बाहेर फिरू नये अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत . मात्र काही महाभाग नियमांची पायमल्ली करत बाहेर आणि बाहेर फिरत आहेत. एका सन्नी नावाच्या मुलानं थेट मुंबई पोलिसांना मी बाहेर जाऊ का?असं ट्वीट करून परवानगी मागितली. मागितलेल्या परवानगीवर मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी देखील त्याला चांगलं खरमरीत उत्तर दिल आहे.
प्रशासनाकडून सूचना
नागरिकांना विनाकारण बाहेर फिरू नये अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत . मात्र काही महाभाग नियमांची पायमल्ली करत बाहेर आणि बाहेर फिरत आहेत. एका सन्नी नावाच्या मुलानं थेट मुंबई पोलिसांना मी बाहेर जाऊ का? असं ट्वीट करून परवानगी मागितली. मग पोलिसांनी देखील या परवानगीला आपल्या हटके अंदाजात उत्तर दिलं, पोलिसांनी दिलेलं उत्तर असं होतंं '' सौर यंत्रणेच्या मध्यभागी तारा, ज्याभोवती पृथ्वी आणि सौर यंत्रणेचे इतर घटक फिरतात, त्याच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी असते, त्यामुळे त्याने स्वत: चे आणि आजूबाजूच्या लोकांचे रक्षण केलं पाहिजं. त्यामुळे बाहेर पाऊल न टाकता आणि स्वत:ला कोरोना व्हायरसच्या संपर्कात आणू नका.
पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांचे उत्तर
सन्नी नावाच्या मुलानं मागितलेल्या परवानगीवर मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी देखील त्याला चांगलं खरमरीत उत्तर दिल आहे. एक उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे भर उन्हात बाहेर जाण्यापेक्षा घरीच राहणं सोयीस्कर आहे.
हेही वाचा-Fact Check : लस घेतल्याने दोन वर्षांत मृत्यू! नोबल पुरस्कार विजेत्यांचा दावा