महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Renaming Rani Bagh: मुंबईच्या राणी बागेचं नामांतर! वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय

बच्चे कंपनीचं आवडतं ठिकाण म्हणून राणी बागेची ओळख आहे. या ठिकाणी असलेले प्राणी पक्षी आणि झाडे यामुळे पर्यटकही मोठ्या प्रमाणात येतात. या राणी बागेचे नाव वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय असे होते. मात्र आता हे मात्र आता राणीबाग वीर जिजामाता भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय या नावाने ओळखली जाणार आहे. तसा प्रस्ताव पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मंजूर केला आहे.

Renaming Rani Bagh
मुंबईच्या राणी बागेचं नामांतर वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय

By

Published : Dec 15, 2022, 10:30 PM IST

मुंबई - इंग्लंडच्या राणीच्या साठी राणीबाग बनवण्यात आली होती. भारत स्वतंत्र्य झाल्यावर १४ जानेवारी १९८० रोजी पालिकेने ठराव क्रमांक १,७४२ अन्वये राणीच्या बागेचे 'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय' असे नामकरण केले होते. राणी बागेमध्ये शंभर वर्षाहून जुनी झाड आहेत. या ठिकाणची वृक्षांची संख्या चार हजारहून अधिक आहे. या उद्यानामध्ये वनस्पती मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे या उद्यानाला बॉटनिक गार्डन असे संबोधले जाते. यामुळे या उद्यानाला वनस्पती उद्यान असं नाव दिलं जावं अशी मागणी केली जात होती.

राणीबागेचे नामांतर -
राणीबागेला वनस्पती उद्यानाचे नाव दिलं जावं किंवा राणीबागेच्या नावामध्ये वनस्पती उद्यान या नावाचा समावेश करावा अशी मागणी गेले कित्येक वर्षे केली जात होती. त्यानुसार आता मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक असलेले इक्बाल सिंग चहल यांनी या नावाला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे आता राणीबाग "वीरमाता जिजामाता भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय" या नावाने ओळखली जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details