मुंबई:राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून 'चौकीदार चोर है' असे विधान केल्याचा आरोप आहे. त्यानंतर रीतसर खटला हा खालच्या न्यायालयातून मुंबई उच्च न्यायालयात वर्ग झाला. त्या अनुषंगाने 'तारीख पे तारीख' असे करत आज न्यायमूर्ती सारंग कोतवाल खंडपीठांसमोर अखेर सुनावणी झाली. त्यावेळेला न्यायालयाने दोन्ही पक्षकारांच्या वकिलांना विचारले की, तुम्हाला दिलासा हवा आहे की संरक्षण हवे आहे, त्याबद्दल ठोस सांगा.
काय आहे प्रकरण?2018 मध्ये देशामधील राफेल विमान खरेदी प्रकरण गाजत असताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात,'चौकीदार चोर है...' असे उपहासात्मक विधान केले होते. या त्यांच्या विधानावर देशभर प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याचा परिणाम म्हणून मुंबईमध्ये गिरगाव पोलीस ठाणे या ठिकाणी राहुल गांधी यांच्या विरुद्ध भाजपच्या एका कार्यकर्त्याने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर महानगर दंडाधिकारी यांच्याकडे ती तक्रार खटल्याच्या स्वरूपात दाखल झाली आणि त्यांनी मानहानीचा खटला दाखल करून घेतला. 2019 मध्ये महानगर दंडाधिकारी यांनी फौजदारी कारवाई सुरू करण्याचे आदेश या खटल्याच्या निमित्ताने दिले होते.
HC Relief To Rahul Gandhi: 'त्या' प्रकरणी राहुल गांधी यांना 2 ऑगस्टपर्यंत मुंबई हायकोर्टाकडून दिलासा - पीएम मोदी अवमान प्रकरण
'चौकीदार चोर है' या विधानानंतर राहुल गांधी यांच्यावर मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात 'एफआयआर' दाखल करत खटला नोंदवला. आज झालेल्या या खटल्याच्या सुनावणीत न्यायमूर्तींनी अखेर 2 ऑगस्ट पर्यंत राहुल गांधी यांना न्यायालयाने दिलासा दिलेला आहे.
राहुल गांधींच्या वकिलांची हायकोर्टात धाव:फौजदारी खटल्याच्या कारवाई निमित्ताने राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. 28 ऑगस्ट 2019 या दिवशी फौजदारी कारवाईच्या अनुषंगाने राहुल गांधी यांना समन्स आदेश बजावले गेले होते. या महानगर दंडाधिकारी यांनी बजावलेल्या समन्स आदेशाच्या विरोधात राहुल गांधी यांचे वकील पासबोला यांनी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलेले आहे. आज झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलत 2 ऑगस्ट पर्यंत सुनावणी तहकूब केली.
हेही वाचा:
- Wife Kidnapping Case: हिंदू मुलीशी प्रेम जमलं, मुस्लिमाचा हिंदूही झाला; मात्र मुलीच्या बापाने... नवऱ्या मुलाचा आरोप
- Conversion Through Gaming App: ठाणे न्यायालयाकडून आरोपी शाहनवाझ खानला तीन दिवसाची ट्रान्झिट रिमांड
- Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरण; गौतम नवलखाच्या जामीन अर्जावर न्यायालयाने बजावली एनआयएला नोटीस