महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मिशन बिगिन अगेन : राज्यात लॉकडाऊनच्या नियमात सुधारणा, 'हे' आहेत नवीन नियम - maharashtra corona update

राज्य सरकारने खासगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यासंबंधीचा आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे.

Lockdown
लॉकडाऊनच्या नियमांत सुधारणा

By

Published : Jun 4, 2020, 6:53 PM IST

मुंबई - देशांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असूनही अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मे रोजी लॉकडाऊनचा नवा टप्पा जाहीर करण्यात आला. त्यामध्ये आणखी शिथिलता देण्यास राज्य सरकारकडून सुरुवात करण्यात आली आहे.

राज्य सरकारने खासगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यासंबंधीचा आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे. आदेशात खासगी कार्यालये १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी (यापैकी जे जास्त असेल) त्यांच्यासोबत कामकाज सुरू करू शकता, असे सांगण्यात आले आहे. ८ जूनपासून ही परवानगी देण्यात आली आहे.

सर्व खासगी कार्यालये क्षमतेच्या १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी (यापैकी जे जास्त असेल) यांच्यासोबत कामकाज सुरू करू शकतात. इतर कर्मचाऱ्यांना घरुन काम करावे लागेल. यावेळी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी कार्यक्रम हाती घेईल. त्यातही खासकरून वृद्धांना संसर्ग होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. ८ जून २०२० पासून हा निर्णय लागू होईल, असे शासनाच्या नव्या आदेशात म्हटले आहे.

केंद्र सरकारने देशभर लॉकडाऊन-५ ची घोषणा केली होती. त्यानंतर राज्य सरकारने ३१ मे रोजी अध्यादेश प्रसिद्ध करत मिशन बिगेन अगेन या नावाखाली लॉकडाऊन शिथील करण्याची घोषणा केली होती. नागरिकांना बाहेर व्यायाम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यावेळी व्यायामाचं कोणतंही साहित्य, गार्डनमधील जीम, ओपन एअर जीम वापरता येणार नाही, अशी सुधारणा मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्या सहीने जारी केलेल्या नव्या आदेशात करण्यात आली आहे. दुकान सम-विषय नियमाने पूर्ण दिवस सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याची जबाबदारी पोलीस आणि महापालिका आयुक्तांवर असणार आहे. एका दिवशी रस्त्याच्या एकाच बाजूची दुकानं सुरू राहतील, असे आदेशात सांगण्यात आले आहे.

रविवार ७ जूनपासून वृत्तपत्र छपाई आणि वाटप करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यावेळी स्वच्छतेच्या(ग्लोज, सोशल डिस्टन्स आणि सँनिटाझर) सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी इतर गोष्टींसाठी कामकाज सुरू ठेऊ शकतात. ई-कंटेट विकसित करणे, उत्तर पत्रिकांचं मूल्यमापन आणि निकाल जाहीर करण्याची कामे यांचा यामध्ये उल्लेख आहे. मुंबई महानगर प्रदेशातील कोणत्याही जिल्ह्यात जाण्यासाठी आता पासची गरज नसून कोणतेही निर्बंध नसणार आहेत. आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्यांवर नियमितपणे लक्ष ठेवले जाणार आहे. अडकलेले मजूर, स्थलांतरित कामगार, पर्यटक यांच्या प्रवासावर आधीच्या नियमांप्रमाणे नियंत्रण असणार आहे, असे नव्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

मिशन बिगिन अगेन : लॉकडाऊन आदेशात काय आहेत सुधारणा?

  1. सार्वजनिक उद्यानांमध्ये व्यायाम करण्यास परवानगी. परंतु, सार्वजनिक ठिकाणची व्यायामाची उपकरणे हाताळण्यास मनाई.
  2. एकल पद्धतीने दिवसाआड दुकाने उघडी राहणार.
  3. 8 जून पासून 10% क्षमतेने खासगी कार्यालय सुरू होणार( जास्तीत जास्त दहा कर्मचाऱ्यांची उपस्थिती)
  4. 8 जूनपासून घरपोच वर्तमानपत्रे सुरू होणार.
  5. बिगर शैक्षणिक कामासाठी( पेपर तपासणी, ई- शिक्षण आणि निकाल) महाविद्यालय शाळा आणि विद्यापीठे खुली करणार.
  6. आंतरजिल्हा आणि आंतरराज्य वाहतूक नियंत्रितच राहणार.
  7. जिल्ह्यांतर्गत मुंबई महानगरक्षेत्रातील वाहतूक आता नियंत्रण मुक्त होणार.
  8. स्थलांतरित मजूर यात्रेकरू आणि पर्यटकांची नियमित तपासणी होणार.

ABOUT THE AUTHOR

...view details