महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Stray Dogs In Mumbai : आता रात्रीच्या अंधारात चमकणार भटके कुत्रे! - मुंबईतील प्लॅनेट फॉर प्लांट्स अँड अनीमल्स

मुंबईतील भटक्या कुत्र्यांचे (Stray dogs In Mumbai) संरक्षण व्हावे, रात्री अपरात्री रस्त्यावर आल्यानंतर त्यांचे अपघात होऊ नयेत यासाठी या कुत्र्यांच्या गळ्यात परावर्तित करणारे रंग लावण्यात येणार आहेत. (reflective colors on necks of Stray dogs).

Stray dogs In Mumbai
Stray dogs In Mumbai

By

Published : Nov 7, 2022, 4:32 PM IST

मुंबई: मुंबईतील भटक्या कुत्र्यांचे (Stray dogs In Mumbai) संरक्षण व्हावे, रात्री अपरात्री रस्त्यावर आल्यानंतर त्यांचे अपघात होऊ नयेत यासाठी या कुत्र्यांच्या गळ्यात परावर्तित करणारे रंग लावण्यात येणार आहेत. (reflective colors on necks of Stray dogs). मुंबईतील प्लॅनेट फॉर प्लांट्स अँड अनीमल्स या सामाजिक संस्थेने मिठीबाई कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत ही नवी मोहीम सुरू केली आहे.

रात्रीच्या अंधारात चमकणार भटके कुत्रे

2000 भटक्या कुत्र्यांवर प्रयोग: रस्त्यावर फिरणाऱ्या अनेक भटक्या कुत्र्यांचे रात्री अपघात होतात. या अपघातांपासून भटक्या कुत्र्यांचे संरक्षण व्हावे यासाठी आता पीपीए या सामाजिक संस्थेने मिठीबाई महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत मिळून भटक्या कुत्र्यांना परावर्तित रंग लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात किमान 2000 भटक्या कुत्र्यांना हे रंग लावण्यात येणार आहेत. मुंबईतील मिठीबाई महाविद्यालयाच्या क्षितिज या समूहातर्फे आणि प्लॅनेट फॉर प्लांट्स अँड एनिमल्स या संस्थेतर्फे मरीन ड्राईव्ह पासून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. पुढील सहा आठवडे ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती पीपीएच्या संस्थापक साक्षी टेकचंदानी आणि यांनी दिली आहे.

कुठे राबवणार मोहीम? :ही मोहीम मुंबईतील मरीन ड्राईव्ह, जुहू समुद्रकिनारा, दादर, शिवाजी पार्क परिसर, वांद्रे कार्टर रोड, बँड स्टँड तसेच वरळी आणि पाम बीच रोडवर राबवण्यात येणार आहे. जलद गतीने वाहने जाणाऱ्या रस्त्यांनजीकच्या भटक्या कुत्र्यांना आधी रंग लावण्यात येणार आहे. मिठीबाई कॉलेजच्या क्षितिज या समूहाचा प्रमुख ओम भानुषाली सांगतो की यावर्षी आम्ही सामाजिक उपक्रम म्हणून भटक्या कुत्र्यांना संरक्षण मिळावे यासाठी त्यांच्यावर रंग लावणार आहोत.

भटक्या कुत्र्यांच्या संरक्षणासाठी उपक्रम:या संदर्भात बोलताना पीपीएच्या संस्थापक साक्षी टेकचंदानी म्हणाल्या की, भटक्या कुत्र्यांचे संरक्षण व्हावे, त्यांचे अपघात होऊ नयेत यासाठी आम्ही ही संकल्पना राबवत आहोत. रात्रीच्या वेळी या कुत्र्यांवरील रंग परावर्तित होऊन वाहन चालकांना कुत्र्यांचा अंदाज येईल. त्यामुळे त्यांचे अपघात होण्याचे प्रमाण नक्की कमी होईल. वास्तविक हे अभियान आम्ही सर्व भारतभरात राबवण्याचा विचार करत आहोत. तसेच मुख्य आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये ते सर्वात आधी राबवण्याचा आमचा विचार आहे. त्याची सुरुवात आणि मुंबईपासून करीत आहोत असेही साक्षी म्हणाल्या. भटक्या कुत्र्यांबाबत नागपूर खंडपीठाने नुकताच एक निर्णय दिला आहे या निर्णयानुसार सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला घालू नये असे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र असे असेल तर आधी सरकारने या भटक्या कुत्र्यांना दत्तक घेऊन त्यांना योग्य निवारा दिला पाहिजे त्यांना खाण्याची व्यवस्था करून दिली पाहिजे असेही साक्षी टेकचंदानी म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details