मुंबई- कर्नाटकी सत्तेचा पुढील पट आता भाजपशासीत गोव्यात पार पडणार आहे. कर्नाटक सरकारचे संकटमोचक डी.के. शिवकुमार पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून १६ नाराज आमदारांना गोव्याच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे. काही वेळापूर्वीच हे आमदार रस्ते मार्गाने गोव्याच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते.
सत्ताधारी काँग्रेस आणि सेक्युलर जनता दलाच्या (जेडीएस) आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सध्या कर्नाटकमधील राजकीय परिस्थिती कमालीची अस्थिर झाले आहे. या सगळ्यामुळे लवकरच एच.डी. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळण्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. या सगळ्या राजकीय नाट्याचा अंक दोन दिवस मुंबईतही रंगला होता.
काँग्रेस आणि जेडीएसच्या नाराज आमदारांनी रविवारी राजीनामा दिल्यानंतर चार्टर्ड विमानाने मुंबई गाठली होती. या सर्व आमदारांना सोफीटेल या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, कर्नाटक सरकारचे संकटमोचक डी.के. शिवकुमार पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून १६ नाराज आमदारांना गोव्याच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे. काहीवेळापूर्वीच हे आमदार रस्तेमार्गाने गोव्याच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते. काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांनी सर्व आमदारांना 'मी येत आहे, तयार राहा', असा संदेश दिला होता.