महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे गमावाव्या लागल्या आवाक्यातला ४ जागा - eknath gaikwad

काँग्रेसच्या चारही जागांवरील पराभव आणि त्यातील मतांची तफावत लक्षात घेतली तर येत्या काळात मुंबईत काँग्रेसची स्थिती सुधारण्यासाठी प्रचंड मोठे चिंतन करावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत काँग्रेसने मुंबईसाठी जे काही निर्णय घेतले त्यातील अनेक निर्णय चुकल्याने त्याची बरीच मोठी किंमत पक्षाला लोकसभा निवडणुकीत मोजावी लागली.

मुंबई काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे गमावाव्या लागल्या आवाक्यातला ४ जागा

By

Published : May 24, 2019, 9:42 AM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामाचा अंतिम कौल गुरुवारी (२३ मे) रोजी जाहीर झाला. काँग्रेसची अंतर्गत गटबाजी आणि त्यातील वादामुळे लाखो मतदार काँग्रेसच्या बाजूने उभे असूनही काँग्रेसला त्याचा लाभ घेता आलेला नाही. त्यामुळे आवाक्यातल्या असलेल्या चारही जागांवर काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. यासाठी तूर्तास एकमेकांवर कोणी जाहीरपणे खापर फोडत नसले तरी, काँग्रेसच्या या गटबाजीने मुंबईत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचे पडसाद कायम राहतील, अशी परिस्थिती आज काँग्रेसची बनली आहे.

काँग्रेसच्या चारही जागांवरील पराभव आणि त्यातील मतांची तफावत लक्षात घेतली तर येत्या काळात मुंबईत काँग्रेसची स्थिती सुधारण्यासाठी प्रचंड मोठे चिंतन करावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत काँग्रेसने मुंबईसाठी जे काही निर्णय घेतले त्यातील अनेक निर्णय चुकल्याने त्याची बरीच मोठी किंमत पक्षाला लोकसभा निवडणुकीत मोजावी लागली.

२०१४ च्या मोदी लाटेनंतर काँग्रेस मुंबईतून संपण्याच्या मार्गावर आली होती. त्याला बळ देण्याचे मोठे काम मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले. ५ वर्षात राज्यात आणि केंद्रात कुठलेही सत्ता नसताना काँग्रेसचे विविध आंदोलने मोर्चे करून काँग्रेसला जिवंत ठेवण्याचे काम निरुपम यांनी केले होते. परंतु लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याने निरुपम यांना मुंबई प्रदेशाध्यक्ष या पदावरून बाजूला करण्यात आले. त्यांच्या ठिकाणी मागील अनेक वर्ष काँग्रेसच्या कामकाजापासून दूर राहिलेल्या माजी खासदार मिलिंद देवरा यांना मुंबई प्रदेशच्या अध्यक्षपदी नेमण्यात आले.

मुंबईत निरुपम आणि त्याविरोधात गट पडले. त्यामुळे निरुपम विरोधातील काँग्रेसमध्ये खदखदत असलेल्या गटाने या लोकसभा निवडणुकीच्या काळात आपली एक वेगळीच चूल निर्माण केल्याने त्याचा मोठा फटका काँग्रेसला मुंबईत बसला. निरुपम यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असताना पक्षाच्या कोणत्याही बड्या नेत्यांचा आधार न घेता आपल्या स्वबळावर अनेक सभा आणि प्रचाराची जोरदार बाजू सांभाळली. मात्र, त्याउलट उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ऐनवेळी उमेदवार म्हणून उभ्या केलेल्या माजी खासदार प्रिया दत्त यादेखील प्रचाराच्या काळात एकट्या पडल्याचे दिसून आले. यात निरुपम विरोधी गटानेही दत्त यांच्या प्रचारासाठी समोर येण्याचे धाडस दाखवले नाही.

नवनियुक्त मुंबई प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यासह राज्यातील कोणताही मोठा नेता प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी फिरकला नाही. तर, दुसरीकडे लोकसभा मतदारसंघ केलेल्या माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या प्रचारासाठी डझनभराहून अधिक काँग्रेसचे नेते वेगवेगळ्या ठिकाणी सभेला पोहोचल्याचे दिसून आले. तरीसुद्धा काँग्रेसचा अंतर्गत वाद आणि त्याचा फटका एकनाथ गायकवाड यांनाही बसला. त्यामुळे ते विजयाच्या जवळ येतील, अशी शक्यता असताना त्यांचा ही सेनेच्या राहुल शेवाळे यांच्या कडून पराभव स्वीकारावा लागला. निरुपम यांनी मागील ५ वर्षात एकाच वेळी भाजपा आणि सेनेलाही अंगावर घेतले होते, त्याचा मोठा राग या दोन्ही पक्षांनी निरुपम विरोधात काढला.

ABOUT THE AUTHOR

...view details