महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Reaction On Budget: शिंदे सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे गाजरचा हलवा -उद्धव ठाकरे - अर्थसंकल्पावर कोण काय म्हणाले

आजचा अर्थसंकल्प चुनावी जुमला असून यामध्ये दुरदृष्टीचा अभाव आहे. तसेच, राज्याचे उत्पन्न किती आणि घोषणा किती याचा ताळमेळ नाही अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. ते अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ते विधिमंडळ परिसरात बोलत होते.

Reaction On Budget
विरोधी पक्ष नेते

By

Published : Mar 9, 2023, 3:44 PM IST

Updated : Mar 9, 2023, 4:06 PM IST

मुंबई :शब्दांचा भडीमार करत फक्त घोषणा करायच्या. मात्र, त्यावर कोणतेही ठोस काम होत नाही. आज विधिमंडळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा दिल्या जात होत्या. मात्र, त्यांच्या स्मारकाबद्दल अर्थसंकल्पात काहीच नाही. तसेच, आज तुकाराम बीज आहे. देहूच्या विकासासाठीही काही यामध्ये नाही असही पवार यावेळी म्हणाले आहेत. याचवेळी 14 मार्चला सुप्रिम कोर्टाच निर्णय येणार आहे. तो निर्णय आपल्या विरोधात जाईल याची भीती वाटत असल्यानेच या अर्थसंकल्पात मोठ्या-मोठ्या घोषणा करण्यात आल्या असही अजित पवार यावेळी माध्यमांशी म्हणाले आहेत.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार : राज्याची परिस्थिती पाहिली तर साडेसहा लाख कोटी रुपयांच्या पुढे राज्यावर सध्या कर्ज आहे. अर्थमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्प कसा असावा असे पुस्त लिहले. मात्र, तसे न लिहता अर्थ संकल्प कसा सादर करावा असे पुस्तक लिहायला हवे होते असा टोला पवार यांनी लगावला आहे. याचवेळी सरकार आजच्या वास्तव परिस्थितीचा विचार करणार की नाही असे म्हणत फक्त घोषणार करण्यात काय अर्थ आहे असही पवार म्हणाले आहेत.

विधान परिषद विरोदी पक्षनेते अंबादास दानवे : यामध्ये फक्त घोषणांचा सुकाळ आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही ठोस नाही. तसेच, बेरोजगार तरुणांसाठीही काही नाही असे म्हणत आपल्या राज्यात गेल्या 20 ते 25 वर्षात कसे उत्पन्न वाढले आहे ते पाहा त्यानंतर आपल्या लक्षात येईल की हा अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांचे फुलोरे, घोषणांचा सुकाळ आहे असही पवार म्हणाले आहेत.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे :आमच्या काळात ज्या योजना झाल्या त्याच पुढे घेऊन जाण्याच काम हे करतायेत. या अर्थसंकल्पात नवीन काहीच नाही. तसेच, विधानपरिषदेत अर्थसंकल्प वाचत असताना मंत्री दिपक केसरकरांनी पंतप्रधानांचा वारंवार उल्लेख केला. मात्र, पंतप्रधांनांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय दिले असे म्हणत हा अर्थसंकल्प गाजर हलवा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ते विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोल होते.

हेही वाचा :Maha Budget 2023 Live Updates : दुग्ध,मत्स्य व्यावसायासाठी 500 कोटींची तरतूद करणार

Last Updated : Mar 9, 2023, 4:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details