महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काय आहेत पीएमसी बँकेवर लादण्यात आलेले निर्बंध? - mumbai pmc bank news

आरबीआयकडून लादण्यात आलेल्या निर्बंधानंतर या संदर्भात आपण अर्थ मंत्रालय व आरबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून लवकरात लवकर बँक ग्राहकांना या समस्येतून बाहेर कसे काढता येईल? याबद्दल चर्चा करत असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

काय आहेत पीएमसी बँकेवर लादण्यात आलेले निर्बंध

By

Published : Sep 24, 2019, 7:28 PM IST

Updated : Sep 24, 2019, 9:32 PM IST

मुंबई -पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर ( पीएमसी बँक) आरबीआयने निर्बंध आणले आहेत. त्यामुळे पीएमसी बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यातून केवळ एक हजार रुपये काढता येणार आहेत. आरबीआयकडून 35 अ अनुसार पुढील सहा महिन्यांसाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत.

हे ही वाचा - पीएमसी बँकेच्या संदर्भात आरबीआय व अर्थ मंत्रालयाशी संपर्क सुरू आहे - किरीट सोमय्या

बँक ग्राहक व छोटे गुंतवणूकदार यांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. आरबीआयकडून लादण्यात आलेल्या निर्बंधानंतर या संदर्भात आपण अर्थ मंत्रालय व आरबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. लवकरात लवकर बँक ग्राहकांना या समस्येतून बाहेर कसे काढता येईल? याबद्दल चर्चा करत असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

पीएमसी बँकेवर लादण्यात आलेले निर्बंध काय आहेत -

  • पीएमसी बँक खातेदारांवर आरबीआयकडून लादण्यात आलेल्या निर्बंधानंतर एका खातेधारकाला एका खात्यात कितीही रक्कम असली तरी केवळ 1 हजार रुपयेच काढता येतील.
  • एखाद्या ग्राहकाने पीएमसी बँकेकडून मुदत ठेवीवर कर्ज घेतले असेल तरी कर्ज फेडण्यासाठी त्याच्या ठेवीचा वापर बँक ग्राहक करू शकतो.
  • पीएमसी बँकेवर आरबीआयने बँकिंग कलम '35 अ' नुसार निर्बंध लादल्यानंतर पीएमसी बँकेवर मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करताना आरबीआयची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. यापुढे ६ महिने तरी आरबीआयच्या परवानगीशिवाय बँकेला कुठलेही नवीन कर्ज वाटप करता येणार नाही.

जुन्या कर्जाच्या नुतनीकरणावर आरबीआयने तात्पुरती बंदी आणली असून पुढील सहा महिने पीएमसी बँक प्रशासनाला कुठलीही गुंतवणूक करता येणार नाही.

हे ही वाचा - पीएमसी बँकेवर 'आरबीआय'कडून निर्बंध, मुंबईत बँक शाखेबाहेर लोकांची गर्दी

हे निर्बंध ६ महिने असले तरी ६ महिन्यानंतर बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन लादलेल्या निर्बंधांबद्दल निर्णय घेतला जाणार आहे.

Last Updated : Sep 24, 2019, 9:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details