महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सर्व इमारतींचे फायर ऑडिट होणे गरजेचे - रवी राजा - रवी राजा

मुंबईतील वांद्रे येथील एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीनंतर विरोधी पक्ष नेता रवी राजा यांनी ही प्रतिक्रिया दिली.

सर्व इमारतींचे फायर ऑडिट होणे गरजेचे - रवी राजा

By

Published : Jul 22, 2019, 9:05 PM IST

मुंबई- केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत इमारतींचे फायर ऑडिट होणे गरजेचे आहे. कमला मिल दूर्घटनेनंतर मुंबईतील सर्व इमारतींचे फायर ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, फायर ऑडीटबाबत दिलेल्या सर्व निर्देशांवर काम होणे गरजेचे आहे. वारंवार होणाऱ्या आग दुर्घटनांना निष्क्रीय प्रशासनच जबाबदार आहे, असा आरोप मुंबई महापालिका विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे.

सर्व इमारतींचे फायर ऑडिट होणे गरजेचे - रवी राजा

मुंबईतील वांद्रे येथील एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीनंतर विरोधी पक्ष नेता रवी राजा यांनी ही प्रतिक्रिया दिली.

एमटीएनएलची ही इमारत ९ मजलीआहे. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली. मात्र, आगीचा धूर इमारतीच्या नवव्या मजल्यापर्यंत पसरला. त्यामुळे घाबरलेले कर्मचारी जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर गेले होते. त्यामुळे इमारतीच्या गच्चीवर जवळपास 100 जण अडकले होते. यांमधील सर्व 84 जणांना अग्निशमन दल आणि रोबोने सुरक्षित बाहेर काढले आहे. ही आग विझवण्यासाठी पहिल्यांदाच मुंबईमध्ये रोबोचा वापर करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details