महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raveena Tandon : रवीना टंडन मुलगी राशासोबत पार्टीत झाली स्पॉट, आई आणि मुलीच्या सौंदर्याची रंगली चर्चा - अभिनेत्री रवीना टंडन

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री रवीना टंडन आजही तिच्या लुकमुळे चर्चेत असते. अलीकडेच रवीना टंडन तिची मुलगी राशा थडानीसोबत एका पार्टीत दिसून आली

Raveena Tandon
Raveena Tandon

By

Published : Jul 16, 2023, 5:31 PM IST

Updated : Jul 16, 2023, 5:39 PM IST

मुंबई : बॉलिवूडची सुंदर रवीना टंडन आजही तिच्या सुंदर लूकने चाहत्यांना वेड लावत आहे. अभिनेत्रीच्या फिटनेस आणि सौंदर्यावरून तिच्या वयाचा अंदाज कोणालाही लावणे तसे अशक्यच आहे. रवीना टंडन सध्या 48 वर्षाची आहे. अलीकडेच अभिनेत्री रवीना टंडन तसेच तिची मुलगी राशा थडानीसोबत एका पार्टीत दिसली. काळ्या लूकमध्ये पार्टीत आल्यावर आई-मुलीच्या जोडीची चांगलीच चर्चा पार्टीत रंगली होती.

पापाराझींसाठी पोज :शनिवारी, 'मोहरा' चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन तिची 18 वर्षांची मुलगी राशा थडानीसह चित्रपट निर्माते-लेखक हिमांशू शर्मा, कनिका धिल्लन यांच्या पार्टीत सहभागी झाली होती. याच दरम्यान अभिनेत्री तिच्या मुलीसोबत पापाराझींसाठी पोज देताना दिसली. रवीना टंडन आणि राशा यांनी पार्टीसाठी ऑल ब्लॅक लूक ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये त्यांचे सौंदर्य अधिकच मोहक दिसत होते. रवीना टंडनच्या लूकबद्दल सांगायचे तर, टंडन यांनी मॅचिंग हील्ससह काळ्या रंगाचा जंपसूट परिधान केला होता. त्याच वेळी, तिने ग्लोइंग मेकअप आणि केसांना खुले सोडले होते. मुलगी राशाचा लूक पाहता रशाने मिनी बॉडीकॉन शॉर्ट आउटफिट घातला होता. मिनरल मेकअप आणि ग्लॉसी लिप कलरमध्ये राशा खूपच सुंदर दिसत होती. तिने टॅन कलरच्या हाय हिल्ससह तिचा जबरदस्त लुक दिसत होता.

चाहत्याने केले राशाचे कौतुक :या गोंडस आई-मुलीच्या जोडीचा व्हिडिओ एका पापाराझीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. त्यांचे व्हिडिओ समोर येताच नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका चाहत्याने लिहिले की, 'कुणी तरी बरोबरच म्हटले आहे की, मुली या आईची सावली असतात.' त्याचवेळी दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, 'ती तिच्या आईसारखीच सुंदर आहे' असे म्हणत एका चाहत्याने राशाचे कौतुक केले आहे. रवीना टंडनची सुंदर मुलगी राशा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती लवकरच अभिषेक उर्फ ​​गट्टू कपूर दिग्दर्शित एका चित्रपटात अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण सोबत दिसणार आहे.

हेही वाचा -Ananya security pushes fan : अनन्या पांडेच्या बॉडी गार्ड्सने फॅनला ढकले, वाचा नंतर काय घडले

Last Updated : Jul 16, 2023, 5:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details