महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! बेपत्ता होणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ; महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर - नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरो

२०१७ साली एकूण ३ लाख ५ हजार २६७ जण बेपत्ता झाले. ज्यात महिलांचे प्रमाण १ लाख ८८ हजार ३२३ इतके होते.२०१८ साली ३ लाख ४७ हजार ५२४ जण बेपत्ता झाले. ज्यात महिलांचे प्रमाण २ लाख २३ हजार ६२१ इतकी आहे. एनसीआरबीच्या अहवालात २०१७ मध्ये ४१८ तृतीयपंथ बेपत्ता असून २०१८ सालात यात वाढ होत ५६४ तृतीयपंथी व्यक्ती बेपत्ता झाले आहेत.

एनसीआरबी
एनसीआरबी

By

Published : Feb 12, 2020, 4:10 PM IST

मुंबई- नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरोच्या अहवाल आला असून देशभरात बेपत्ता होणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ झाली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अहवालात २०१६ ते २०१८ दरम्यान बेपत्ता झालेल्या महिलांची संख्या जवळपास ३ लाख ४७ हजार ५२४ इतकी आहे. देशात महिलांच्या गायब होण्याच्या आकडेवारीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. तर, पश्चिम बंगालचा दुसरा क्रमांक लागत असून तिसऱ्या स्थानावर मध्यप्रदेशचा क्रमांक लागतो. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर दिल्ली व पचव्या स्थानी तामिळनाडू राज्य आहे.

एनसीआरबीच्या अहवालात बेपत्ता होणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ

२०१६ साली संपूर्ण देशात दोन लाख ९० हजार ४३९ जण बेपत्ता झाले. ज्यात महिलांचे प्रमाण १ लाख ७२ हजार २१ इतकी आहे. तर, २०१७ साली एकूण ३ लाख ५ हजार २६७ जण बेपत्ता झाले. ज्यात महिलांचे प्रमाण १ लाख ८८ हजार ३२३ इतके होते.२०१८ साली ३ लाख ४७ हजार ५२४ जण बेपत्ता झाले. ज्यात महिलांचे प्रमाण २ लाख २३ हजार ६२१ इतकी आहे. एनसीआरबीच्या अहवालात २०१७ मध्ये ४१८ तृतीयपंथ बेपत्ता असून २०१८ सालात यात वाढ होत ५६४ तृतीयपंथी व्यक्ती बेपत्ता झाले आहेत. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक महिला बेपत्ता असून त्यात मुंबई शहर सर्वात आघाडीवर आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, देशात महाराष्ट्रातून गायब होणाऱ्या महिलांच्या संख्येत गेल्या ३ वर्षांत लक्षणीय वाढ झाली असून सन २०१६ या वर्षात तब्बल २८ हजार ३१६ महिला बेपत्ता झाल्या आहेत. तर २०१७ सालात २९ हजार २७९ महिला बेपत्ता झाल्या असून २०१८ या वर्षात यात वाढ होऊन ३३ हजार ९६४ महिला बेपत्ता झाल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची लोकसंख्या ही देशात सर्वाधिक असून या शहरात महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण भारतातील कुठल्याही शहरांपेक्षा अधिक आहे. मुंबईतून २०१७ या वर्षी ४ हजार ७१८ महिला बेपत्ता झाल्या असून यात २०१८ साली वाढ झाली होती. मुंबईतून गायब झालेल्या महिलांची संख्या ५ हजार २०१ एवढी झाली आहे. शिक्षणाचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या पुण्यात २०१७ साली एकूण २ हजार ५७६ महिला बेपत्ता झाल्या आहेत. तर, २०१८ साली या संख्येत वाढ होत गायब झालेल्या एकूण महिलांची संख्या ही २ हजार ५०४ एवढी आहे. ठाणे शहरातून २०१७ साली १ हजार ७९८ महिला बेपत्ता झाल्यानंतर २०१८ मध्ये यात वाढ होत २ हजार ३५२ महिला बेपत्ता झाल्या आहेत.

हेही वाचा-पालिका सभागृहात उंदीर, मग मुंबई कशी स्वच्छ ठेवणार?

ABOUT THE AUTHOR

...view details