मुंबई- फोन टॅपिंग प्रकरणी वादात अडकलेल्या राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या माजी प्रमुख डॉक्टर रश्मी शुक्ला यांच्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडून हैदराबाद येथे सलग दोन दिवस डॉक्टर रश्मी शुक्ला यांची जबाब नोंदविण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हैदराबाद येथे पाच जणांचे पथक दाखल झाले होते. या पथकाने शुक्ला यांचा जबाब नोंदवला आहे.
2 वेळा दिले होते समन्स
मुंबई पोलिसांकडून या अगोदर दोन वेळा डॉक्टर रश्मी शुक्ला यांना या प्रकरणी जबानी नोंदविण्यासाठी समन्स बजावण्यात आलेले होते. मात्र, हैदराबाद येथे सीआरपीएफच्या अतिरिक्त महासंचालक पदावर असलेल्या डॉक्टर रश्मी शुक्ला यांनी कोरोना संक्रमणामुळे मुंबई येणे शक्य नसल्यामुळे ई-मेल वर प्रश्न पाठवावेत, त्यानुसार उत्तर देण्यात येईल असे मुंबई पोलिसांना कळवले होते. मात्र त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयकडून मिळालेल्या आदेशानंतर मुंबई पोलिसांच्या पाच सदस्यांच एक पथक हैदराबाद येथे जाऊन 19 व 20मेच्या दरम्यान डॉक्टर रश्मी शुक्ला यांची जबाब नोंदविला आहे.