मुंबई : भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला आणि महाराष्ट्र केडरच्या इतर दोन आयपीएस अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ नियुक्ती समितीने पोलीस महासंचालक (डीजीपी) या पदावर बढती दिली आहे. असे पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 1998 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी शुक्ला, सदानंद दाते आणि अतुलचंद्र कुलकर्णी हे दोघेही 1990 च्या बॅचचे आहेत,त्यांना पदोन्नती मिळालेली आहे.
तिनही पोलीस अधीकारी महाराष्ट्रातील : विशेषकरून तिनही पोलीस अधीकारी महाराष्ट्रातील आहे. रश्मी शुक्ला आणि अतुलचंद्र कुलकर्णी हे सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक म्हणून केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख आहेत. शुक्ला यांच्यावर महाराष्ट्रातील राज्य गुप्तचर विभागाच्या (एसआयडी) प्रमुख असताना काही राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता. अतुलचंद्र कुलकर्णी यांनी मुंबईचे सहआयुक्त (गुन्हे शाखा ) म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी उच्चभ्रू महाराष्ट्र एटीएसचे प्रमुखपदही भूषवले आहे आणि इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) मध्ये त्यांनी काम केले आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील मोठ्या क्षेत्राचा समावेश असलेल्या नव्याने स्थापन झालेल्या मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे ते पहिले आयुक्त होते. या अधिकार्यांना केंद्र सरकारने पॅनेलमध्ये समाविष्ट केले आहे. त्यांच्या पदोन्नतीचे स्वतंत्र आदेश अद्याप महाराष्ट्र सरकारने जारी केलेले नाहीत.
रश्मी शुक्लांवर फोन टॅपींग प्रकरण :राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच रश्मी शुक्ला यांच्याविरोधात जूनमध्ये 700 पानी आरोपपत्र दाखल देखील करण्यात आले होते. मात्र त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि आता शिंदे-फडणवीस सरकार असल्यामुळे याप्रकरणी रश्मी शुक्लांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. कारण शुक्लांविरोधात खटला चालविण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. पोलिसांनी कोर्टात अहवाल सादर केल्यानंतर केस बंद करणार असल्याचे राज्य सरकार तसेच गृहविभागाने म्हटले आहे. त्यामुळे माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
फोन बेकायदेशीरपणे टॅप : दरम्यान 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजप नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केले होते. वेगवेगळ्या कारणासाठी परवानगी घेत शुक्ला यांनी या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी मुख्य दंडाधिकारी न्यायालयात 700 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. परंतू आता शिंदे-फडणवीस सरकारने ही केसच बंद करण्याचे ठरवले असल्यामुळे शुक्लांना दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा :Pune Crime : धक्कादायक! पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी; कोरेगाव पार्क परिसरात एकच खळबळ