महाराष्ट्र

maharashtra

मुंबईत आढळली गिधाडाची दुर्मिळ प्रजात

By

Published : Jan 2, 2021, 10:56 PM IST

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दुर्मिळ अशा हिमालय ग्राफिक गिधाडाचे दर्शन झाले आहे. वन अधिकाऱ्यांना हे गिधाड आढळून आले आहे. माहाराष्ट्रत गिधाडांच्या अनेक प्रजातींची नोंद आढळते, मात्र कालओघात यातील अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत.

हिमालय ग्राफिक गिधाड
हिमालय ग्राफिक गिधाड

मुंबई-नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दुर्मिळ अशा हिमालय ग्राफिक गिधाडाचे दर्शन झाले आहे. वन अधिकाऱ्यांना हे गिधाड आढळून आले आहे. माहाराष्ट्रत गिधाडांच्या अनेक प्रजातींची नोंद आढळते, मात्र कालओघात यातील अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत. आता हे हिमालय ग्राफिक गिधाड मुंबईत आढळून आल्याने पर्यावरण प्रेमींकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

मुंबईत आढळली गिधाडाची दुर्मिळ प्रजात

हिमालय ग्राफिक गिधाड ही गिधाडाची अतिशय दुर्मिळ प्रजात मानली जाते. हा पक्षी उत्तर महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशात आढळून येतो. मात्र पहिल्यांदाच हा पक्षी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळून आला आहे. या गिधाडावर सध्या नॅशनल पार्कच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष ठेवले असून, त्याच्या हालचालींची नोंद ठेवण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details