मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा कायम असून, भाजपप्रणित आघाडीला राज्यासह देशात स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यावेळी राज्यात दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी आपला बालेकिल्ली शाबूत राखला आहे. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांना आपला गड ताब्यात ठेवण्यात अपयश आले आहे. त्यामुळे एक प्रदेशाध्यक्ष जिंकले तर एक प्रदेशाध्यक्ष हारले आहेत.
एक प्रदेशाध्यक्ष जिंकले दुसरे मात्र हारले - delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा कायम असून, भाजपप्रणित आघाडीला राज्यासह देशात स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यावेळी राज्यात दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
एक प्रदेशाध्यक्ष जिंकले एक मात्र हारले
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब हे जालना लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडूण आले आहेत. मात्र, अशोक चव्हाणांना आपला नांदेडचा गड कायम राखण्यात अपयश आले आहे. प्रदेशाध्यक्षांचाच पराभव झाल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. रावसाहेब दानवेंनी काँग्रेसच्या विलास औताडेंचा पराभव केला. तर भाजपच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांचा ४० हजार मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे राज्यात एक प्रदेशाध्यक्ष हारले तर एक प्रदेशाध्यक्ष जिंकले.
Last Updated : May 24, 2019, 10:26 PM IST