महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Malad Masti Event : मालाड मस्तीत रणवीर सिंग, रोहित शेट्टींनी केले सर्कस चित्रपटाचे प्रमोशन - Ranveer Singh in Malad Masti

मालाड मस्ती कार्यक्रमात ( Malad Masti Event ) अभिनेते रणवीर सिंग व रोहित शेट्टी यांनी आगामी सर्कस चित्रपटाचे प्रमोशन ( Circus movie promotion in Malad Masti ) केले. मालाड मस्तीमध्ये खेळ, योगासने, फुटबॉल, नृत्य अशा अनेक प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात येत असते. आमदार अस्लम शेख यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आज रविवारी सकाळी भारती सिंग, एमिवे बंताई रॅपर, गायक सलमान अली, डान्सर अभिनेता सलमान युसूफ खान, सिद्धार्थ निगम, अभिषेक निगम आणि चिंकी मिंकी हे कलाकारही मालाड मस्तीत उपस्थित होते.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 11, 2022, 3:56 PM IST

मालाड मस्ती कार्यक्रमात सर्कस चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले.

मुंबई: आमदार अस्लम शेख यांनी आयोजित केलेल्या ''मालाड मस्ती'' या कार्यक्रमात ( Malad Masti Event ) "सर्कस'' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ( Circus movie promotion in Malad Masti ) रणवीर सिंग, रोहित शेट्टी आणि वरुण शर्मा मालाडला आले होते. आज रविवारी सकाळी भारती सिंग, एमिवे बंताई रॅपर, गायक सलमान अली, डान्सर अभिनेता सलमान युसूफ खान, सिद्धार्थ निगम, अभिषेक निगम आणि चिंकी मिंकी हे कलाकारही मालाडच्या मस्तीत आले आणि सर्वांनीच जनतेचे भरपूर मनोरंजन केले. रणवीर सिंग आणि वरुण शर्मा एकत्र नाचले व मजा केली. लोकांनीही खूप डान्स केला. त्याचबरोबर त्याने आपल्या सर्कस या चित्रपटाविषयी लोकांना सांगितले आणि चित्रपट पाहण्याचे आवाहन केले.

बाल अत्याचाराबाबत जागरूकता - अभिनेता सलमान युसूफ खाननेही लोकांना डान्स करायला भाग पाडले. आमदार अस्लम शेख यांनी मालाडच्या जनतेला खूप आनंद दिला. त्याचबरोबर मालाड मस्तीचे मुख्य कारण असलेल्या बाल अत्याचाराबाबत त्यांनी लोकांना जागरूक केले. येथे आलेल्या सर्व सेलिब्रिटी पाहुण्यांनी आमदार अस्लम शेख यांना या मालाड मस्तीच्या आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या आणि हा एक उत्तम कार्यक्रम असल्याचे सांगितले. आमदार अस्लम शेख म्हणतात की, ''मालाड मस्ती 2022'' च्या आयोजनाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये, समाजात बाल अत्याचाराबाबत जनजागृती करणे हा आहे. लहान मुलांच्या शोषणाची जाणीव पालकांना, माणसांना, समाजाला व्हावी आणि लहान मुलांना समाजातील वाईट शक्तींपासून संरक्षण मिळाले पाहिजे, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे.


मालाड मस्तीचे पाचवे वर्ष: मालाड मस्तीचे हे पाचवे वर्ष आहे. मालाडची मस्ती रविवारी सकाळी आयोजित केली जाते. येथे अनेक प्रकारचे खेळ, झुम्बा, योगा, चित्रकला आणि अनेक प्रकारच्या उपक्रमांचा आनंद लुटण्यासाठी लोक हजारोंच्या संख्येने येतात. गोल्ड मेडल स्विचेसने प्रायोजित केलेल्या मालाड मस्ती मध्ये बाल अत्याचाराबद्दल जनजागृती करणे अशी यावर्षीची थीम आहे. उल्लेखनीय म्हणजे मालाड मस्ती २०२२ हे मालाड पश्चिम येथील इनऑर्बिट मॉलजवळ आयोजित करण्यात आले होते. लोकांनी घराबाहेर पडावे, मोबाइल सोडून मित्र-मैत्रिणींना भेटावे, नवीन गोष्टी पाहाव्यात आणि मजा करावी, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्याची कल्पना आहे. मालाड मस्ती लोकांना त्यांच्या घरातून बाहेर पडण्याची आणि एक मजेने भरलेला रविवार घालवण्याची संधी देते. हा कार्यक्रम म्हणजे केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नाही तर लोकांना, कुटुंबांना जोडण्याचा आणि मौजमजेच्या वातावरणात समाजात जागृती निर्माण करण्याचा एक मार्ग आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details