मुंबई - गेल्या ५ वर्षाच्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचा, राज्याचा विकास झाला असल्याचे वक्तव्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केले. आश्वासनापेक्षा विश्वासावर मी भाजपमध्ये प्रवेश केल्याचेही रणजितसिंह म्हणाले.
आश्वासनापेक्षा विश्वासावर केला भाजपमध्ये प्रवेश - रणजितसिंह मोहिते पाटील
माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. आश्वासनापेक्षा विश्वासावर मी भाजपमध्ये प्रवेश केल्याचेही रणजितसिंह म्हणाले.
माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. विजयसिंह मोहिते पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी कृष्णा भिमा स्थिरीकरणाचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ही योजना पूर्ण झाल्यास त्याचा फायदा ६ जिल्हे २१ तालुक्यांना होणार असल्याचे रणजितसिंह म्हणाले. पक्ष जी काय जबाबदारी देईल ती पूर्ण करेल. पक्षाने उमेदवारी दिल्यास माढ्यामधून लढण्याचे संकेतही यावेळी त्यांनी दिले आहेत.