महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शीला दीक्षित यांच्या निधनाने स्त्रीहक्कासाठी लढणारे सुसंस्कृत व्यक्तीमत्त्व हरपले - रामदास आठवले - रामदास आठवले

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा शीला दीक्षित यांचे निधन झाले आहे. केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांनी शीला दिक्षित यांना श्रद्धांजली अर्पण करताना, त्यांच्या निधनाने स्त्रीहक्कासाठी लढणारे सुसंस्कृत व्यक्तीमत्त्व हरपल्याचे म्हटले आहे.

रामदास आठवले यांची शीला दिक्षित यांना श्रद्धांजली

By

Published : Jul 20, 2019, 6:36 PM IST

मुंबई - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शीला दीक्षित यांचे शनिवारी दुपारी ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शीला दिक्षित यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शीला दिक्षित यांच्या निधनाने स्त्रीहक्कासाठी लढणारे सुसंस्कृत व्यक्तीमत्त्व हरपले

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री काँग्रेस आय पक्षाच्या वरिष्ठ नेत्या शीला दिक्षित यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रातील सुसंस्कृत निस्पृह गरिबांच्या आणि महिलांच्या हक्कासाठी झटणारी दिल्लीची रणरागिणी असणारे व्यक्तीमत्त्व हरपले आहे. अशा शब्दात रामदास आठवले यांनी दिवंगत शीला दिक्षित यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

महिला गुणवत्तेत पुरुषांपेक्षा कमी नाही हे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात महिला गुणवत्तेत पुरुषांपेक्षा कमी नाही हे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे भारतीय स्त्रियांना समान अधिकार दिला. या जाणिवेतून त्या सदैव समतेच्या पुरस्कर्त्या राहिल्या. युनोमध्ये त्यांनी भारतीय स्त्रियांचे पाच वर्षे प्रतिनिधी केले. स्त्रियांच्या समान अधिकारासाठी तसेच स्त्रियांवर होणार्‍या अन्याय अत्याचार विरोधात लढणार्‍या त्या नेत्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर त्यांना विश्वास होता. असे आठवले यांनी दिक्षित यांच्या बद्दल सांगितले.

राजकारणातील महिला शक्तीच्या त्या प्रतिक

एखाद्या महिलेने जिद्दीने राजकारणात, समाजकारणात ठाम भूमिका घेऊन काम केल्यास मुख्यमंत्री पदाची मजल गाठता येऊ शकते. ही हिम्मत त्यांनी त्यांच्या जीवनातून स्त्रियांना दिली आहे. शीला दिक्षित यांच्या निधनामुळे दिल्लीतील महिलांना प्रेरणा देणार्‍या महिला शक्तीचे प्रतिक हरपले आहे. अशी शोकभावना रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details