मुंबई- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी अवमानकारक वक्तव्य करत आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबत काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये प्रचंड वैचारिक मतभेद आहेत. राहुल गांधी यांनी केलेलेला सावरकरांचा अवमान शिवसेनेला सहन होत नसेल तर त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बरखास्त करावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केले.
'...तर शिवसेनेने काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बरखास्त करावे'
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबत काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये प्रचंड वैचारिक मतभेद आहेत. त्यामुळे शिवसेनेने काँग्रेससोबतचे सरकार बरखास्त करावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
शिवसेना आणि काँग्रेसची विचारधारा परस्पर विरोधी आहे. या पक्षांची युती अनैसर्गिक आहे. सावरकरांच्या अवमानानंतर शिवसेना वाघाचा बच्चा आहे हे दाखवून देण्याची हीच ती वेळ आहे. तसा शिवसेनेने काँग्रेसला धडा शिकविला पाहिजे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाघासारखी आहे. राहुल गांधींना इशारा देणारी डरकाळी शिवसेने आता फोडली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बरखास्त करावे. शिवसेनेने काँग्रेस सोबतचे सरकार बरखास्त केल्यास भाजप सोबत पुन्हा महाराष्ट्रात सरकार स्थापन करावे. सेना-भाजप महायुतीचे सरकारच स्थिर टिकाऊ सरकार ठरेल, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. राहुल गांधींच्या विधानाने या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये या आठवड्यात राजकीय भूकंप होईल असे विधान देखील रामदास आठवले यांनी केले आहे.
हेही वाचा - शिवसेनेला सरकार पाहिजे, की सावरकर? शहानवाज हुसेन यांचा सवाल
TAGGED:
सरकार बरखास्त करावे