अयोध्या : भगवान प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा धार्मिक विधी काल मंगळवारपासून सुरू झालाय. पहिल्या दिवशी प्रायश्चित्त व कर्मकुटी पूजा करण्यात आली. वाराणसीच्या वैदिक विद्वानांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. विधीचं प्रमुख यजमान डॉ. अनिल मिश्रा होते. त्याच अनुषंगानं आज बुधवार (17 जानेवारी) राम मंदिर परिसरात फेरफटका मारण्यात येणार आहे. त्यानंतर प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे.
गर्भगृहाचे होणार शुद्धीकरण : श्रीरामाच्या मूर्तीचं आणि त्याचबरोबर विधीनुसार परिसराचं दर्शन घेतलं जाणार आहे. यानंतर गर्भगृहाचं शुद्धीकरण केलं जाणार आहे. मंगळवारपासून प्राणप्रतिष्ठापना विधीला सुरुवात झाली आहे. येथील कार्यक्रमाचं ठिकाण असलेल्या अयोध्या धाम बस स्थानकावर पोहोचल्यानंतर महंत नृत्य गोपाल दास यांनी स्वत:च्या हाताने अगरबत्ती प्रज्वलित केली. पहिल्या दिवसाचे धार्मिक विधी विवेक सृष्टी संकुलात झाले. तर, उर्वरित विधी रामजन्मभूमी संकुलात होणार आहेत.
देशभरातील 121 विद्वानांना निमंत्रण : पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमात विवेक सृष्टी आश्रमाच्या प्रांगणात काशीतील विद्वान पूजा साहित्यासह उपस्थित होते. मुख्य यजमान डॉ. अनिल मिश्रा यांच्या उपस्थितीत प्रायश्चित्त व कर्मकुटी पूजनाचा विधी पार पडला. मूर्ती तयार करणारे अरुण योगीराज यांनीही विधीत सहभाग घेतला. भगवान श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाशी संबंधित धार्मिक विधी 21 जानेवारीपर्यंत दररोज सुरू राहणार आहेत. हे सर्व विधी करण्यासाठी देशभरातून 121 विद्वानांना आमंत्रित करण्यात आलं आहे. काशीचे पंडित गणेशवर शास्त्री द्रविड आणि पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विधी केले जात आहेत.
कर्मकुटीची पूजा केली जाते : प्रायश्चित्त आणि कर्म कुटीची पूजा केली जाते. कारण, ज्या खडकापासून देवाची मूर्ती बनवली जाते. त्याला, हातोडा आणि छिन्नीने मारलं जातं. त्यातून सुंदर मूर्ती घडते. आध्यात्मिक मान्यतेनुसार, खडकालाच परमेश्वराचं शरीर मानलं जातं. यामध्ये प्राणप्रतिष्ठापना केली जाते. अशा स्थितीत प्रायश्चित्त पूजा आणि कर्मकुटी पूजा ही प्रभूला झालेल्या दुखापतीची क्षमा मागण्यासाठी केली जाते. या विधीमध्ये ज्या ठिकाणी देवतेची मूर्ती घडवली जाते. तिचीही पूजा केली जाते. सर्व विधी करण्यासाठी देशभरातून 121 विद्वानांना निमंत्रित करण्यात आलं आहे. काशीचे पंडित गणेशवर शास्त्री द्रविड आणि पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विधी केले जात आहेत.