महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Adil Durrani In Judicial Custody : राखी सावंतचा पती आदिल दुर्राणीला न्यायालयीन कोठडीत - अभिनेत्री राखी सावंत

अभिनेत्री राखी सावंत हिचा पती आदिल दुरानी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आदिल खान दुर्राणी याला मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी काल अटक केली होती. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

Adil Durrani
आदिल दुर्राणी न्यायालयीन कोठडीत

By

Published : Feb 8, 2023, 8:46 PM IST

आदिल दुर्राणी न्यायालयीन कोठडीत

मुंबई :राखी सावंत, आदिल दुर्राणी यांच्यामध्ये वाद समोर आल्यावर ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हाच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपी आदिलला अटक केली होती. बुधवारी पोलिसांनी आदिल दुर्राणी याला कोर्टात हजर केले. मा. न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. कोर्टात दाखल पुराव्याच्या अनुषंगाने आरोपी आदिल यांला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

काल अटक झाली होती अटक : अभिनेत्री राखी सावंत हिचा पती आदिल खान दुर्राणी याला मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी काल अटक केली होती. आज ओशिवरा पोलिसांनी अंधेरी कोर्टामध्ये आरोपी आदिल दुर्राणीला हजर केले असता फिर्यादी यांच्या वतीने वकील फाल्गुनी यांनी जोरदार आर्ग्युमेंट केले. पोलिसांनी तपास कामासाठी सात दिवसाची पोलीस कोठडी देखील मागितली होती. मात्र, न्यायालयाने दोन्ही बाजूंचे आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर आदिल दुरानी याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मारहाणीच्या आरोपाखाली अटक :आदिल विरोधात ओशिवरा पोलिसांनी एफआयआरमध्ये आयपीसीची कलम 498 (ए) आणि 377,406,420 गुन्हा दाखल करण्यात आला होता. ड्रामा क्वीन राखी सावंतचे वैयक्तिक आयुष्य खूप चर्चेत आहे. खरं तर, अभिनेत्रीने पती आदिल खान दुर्रानीवर अनेक गंभीर आरोप केले होते. तसेच पोलिसात तक्रारही केली होती. त्यानंतर आदिलला पोलिसांनी मंगळवारी चौकशीसाठी बोलावले होते. त्याचवेळी अभिनेत्री राखी सावंतच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा पती आदिल खान दुर्राणी याला मारहाणीच्या आरोपाखाली अटक केली आहे.राखीला नुकतेच मुंबईच्या ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एफआयआर दाखल होताच आदिलला पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली. आणि पोलिसांनी आज आरोपी आदिलला न्यायालयात हजर केले.

राखीने आदिलवर केला आरोप?

1 राखीने आदिलवर तिची आई जया भेडा यांच्या काळजीचा खर्च चुकवल्याचा आरोप केला आहे.
2 आईच्या मृत्यूला आदिल जबाबदार असल्याचा दावाही राखीने केला होता.
राखी सावंतने आदिलवर तिचे पैसे आणि दागिने घेतल्याचा आरोपही केला आहे.
3 राखी सावंतनेही आदिलवर अत्याचार आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तसेच राखीने आदिल खानवर दुसऱ्या मुलीसोबत एक्सट्रा मटेरियल अफेअरचा आरोपही केला आहे.

माझे आयुष्य उद्ध्वस्त केले :या प्रकरणी राखी सावंतने पोलिसांसमोर आपले म्हणणे मांडले आहे. एका पापाराझीला दिलेल्या ऑडिओ स्टेटमेंटमध्ये राखी म्हणाली, आदिलला अटक करण्यात आली आहे. कारण मी त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. हे नाटक नाही. त्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. त्याने मला मारहाण केली. त्याने माझे पैसे घेतले. अभिनेत्री पुढे म्हणाली की, आदिलने तिला सांगितले होते की त्याच्या मौत्रीनी सोबत ब्रेकअप झाले आहे. आता तो त्याची कथित मैत्रीण तनुसोबत राहत असल्याचे तीने म्हटले होते.


हेही वाचा -New MLC Took Oath : नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांनी पदाची घेतली शपथ

ABOUT THE AUTHOR

...view details